VIDEO श्रेया घोषालनं तिच्या घरात साथसंगतीशिवाय गायलेलं 'ते' एव्हरग्रीन गाणं झालं VIRAL

VIDEO श्रेया घोषालनं तिच्या घरात साथसंगतीशिवाय गायलेलं 'ते' एव्हरग्रीन गाणं झालं VIRAL

मूळ पाकिस्तानी गायिका फरिदा खानूम यांचं हे गाणं श्रेया स्वतः पियानो वाजवत गातानाचा हा व्हिडिओ आहे.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : गायकांचा खासगीतला रियाज ऐकताना त्यांचा तो लागलेला आवाज ऐकण्यातली गंमत काही वेगळीच असते. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने पियानोच्या साथीत इतर कुठल्याही साथसंगतीशिवाय गायलेलं एक गाणं सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 'आज जाने की जिद ना करो' हे गाणं तसं सदाबहार! मूळ गायिका फरिदा खानूम यांनी तबला, पेटीच्या साथीत गायलेलं हे गाणं अनेकांच्या ऐकलं असेल आणि तोच आवाज कानात घुटमळत असताना श्रेयाच्या आवाजातलं हे गाणं ऐकायलाच हवं असं आहे. श्रेयाने घरातच फक्त पियानोच्या साथीत हे गाणं गायलं आहे. स्वतःच पियानोही वाजवला आहे.

श्रेया घोषालने यापूर्वीही काही स्टेज शोमधून आज जाने की जिद ना करो हे गाणं गायलं आहे. पण हा कुठल्याही इफेक्टशिवाय केवळ स्वानंदासाठी गायलेलं हे गाणं लोकांना जास्त भावतंय. स्टेज शोचा तामझाम इथे नाही, कुठलाही जास्तीचा वाद्यवृंद नाही निव्वळ आवाजाची जादू इथे ऐकायला मिळते आहे.

हे वाचा - अर्थमंत्र्यांनी घर खरेदीसाठी केली मोठी घोषणा

आज जाने की जिद ना करो हे गाणं अनेक दिग्गज गायकांनी गायलं आहे. आशा भोसलेंपासून अरिजित सिंगपर्यंत अनेकांनी हे गाणं आपापल्या शैलीत गायलं आहे. मूळ गाणं पाकिस्तानी कवि फ़य्याज़ हाशमी यांची नज्म आहे. फरीदा खानुम या पाकिस्तानी गायिकेनं ते लोकप्रिय केलं.

---------------------------------------------------------------------

'पत्रीपूल कब बनेगा' कल्याणकर तरुणाचं रॅप साँग, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 05:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading