Home /News /entertainment /

गुन्हेगार मित्रांच्या दोस्तीची कथा; YAARA च्या धडाकेबाज ट्रेलरचा VIDEO पाहा

गुन्हेगार मित्रांच्या दोस्तीची कथा; YAARA च्या धडाकेबाज ट्रेलरचा VIDEO पाहा

विद्युत जामवालच्या Yaara चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

    मुंबई, 13 जुलै : बॉलिवूडचा अ‍ॅक्शन सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्युत जामवालच्या (Vidyut Jammwal) यारा चित्रपटाचा ट्रेलर (yaara trailer) रिलीज झाला आहे. हा चित्रपट फ्रेंडशिप डेला म्हणजे 30 जुलैला ऑनलाइन रिलीज होणार आहे. झी5 प्रिमियमवर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. यारा चित्रपट म्हणजे चार मित्रांची कथा आहे. फ्रेंडशिप डेला यारा चित्रपटाच्या निमित्ताने तुम्हाला अनोख्या मैत्रीची कहाणी पाहायला मिळणार आहे. हा एक गँगस्टर ड्रामा आहे. फागुन, मितवा, रिझवान आणि बहादूर या चौकडी गँगची ही स्टोरी. प्रत्येक बाबतीत एकमेकांची साथ देणारे हे मित्र. मैत्री आणि गुन्ह्यांमध्येही त्यांची भागीदारी असते. अशा या मैत्रीला आयुष्यातील एका कठीण परिस्थितीतून जावं लागतं. त्यानंतर काय काय होतं, ते सांगणारा हा चित्रपट. हा चित्रपट 2011 साली आलेल्या फ्रेंच फिल्म गँगस्टोरीचा रिमेक आहे. चित्रपटात विद्युत जामवाल, अमित साध, विजय वर्मा, केनी बसुमतारी आणि श्रुती हसन मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक तिग्मांशु धुलिया यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आपल्या अॅक्शनसाठी प्रसिद्ध असलेला विद्युत जामवालची अॅक्शन या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. हे वाचा - 'दिल बेचारा'तील अभिनेत्रीसह रोमँटिक डान्स; सुशांत सिंह राजपूतचा Unseen Video चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलरही प्रेक्षकांना आवडला आहे. आता सर्वांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या