S M L

हॅलो..,तुमच्यासोबत बोलण्यासाठी येतेय 'आरजे सुलु' !

अखेर अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी सिनेमा 'तुम्हारी सुलु'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2017 08:43 PM IST

हॅलो..,तुमच्यासोबत बोलण्यासाठी येतेय 'आरजे सुलु' !

14 आॅक्टोबर : अखेर अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी सिनेमा 'तुम्हारी सुलु'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही मिनिटांच्या ट्रेलरमध्येच विद्याने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. युट्यूबवरही विद्याच्या या नॅचरल लुकला लोकांनी भरभरुन प्रतिसाद मिळतोय.

सुलुच्या भुमिकेत विद्या एकदम खुलून दिसत आहे. एका सर्वसामान्य गृहिनीची भूमिका साकारताना विद्या थोडी हेल्दी दिसून आली. या ट्रेलरमध्ये विद्याचे हटके विनोदही मजेशीर आहे.

विद्याचा लुक या सिनेमासाठी नॅचरल ठेवण्यात आला आहे.

सिनेमाची कथा एका गृहिणीची आहे. या गृहिणीला रेडिओ जॉकी बनायचं आहे. या सिनेमात अव्यवसायिक गृहिणीचा आणि तिच्याकडून होणाऱ्या चुकांचा प्रवास दाखवला आहे. त्यात मध्यमवर्गीय कुटुंबाच्या समस्या मोठ्या पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न या सिनेमात केला आहे.

ही अश्या मध्यमवर्गीय घरातील कथा आहे त्यात जुणं टी-शर्ट फेकुन दिलं जात नाही तर त्याची पायपुसणी बनवली जाते. टूथपेस्ट तोपर्यंत नाही फेकली जात जोपर्यंत तीला चारही बाजूने कापून वापरली जाते.

Loading...
Loading...

या सिनेमाचं दिग्दर्शन भूषण कुमार, तनुज गर्ग आणि अतुल कास्बेकर यांनी केलं आहे. विद्या बालनसह या सिनेमात मानव कौला, नेही धुपिया आणि आरजे मलिष्का ही पहायला मिळणार आहे.

सगळ्यांना आतुरता असलेला हा विद्या बालनचा मजेदार सिनेमा 17 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2017 08:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close