...आणि हॉटेलच्या खिडकीतून उतरली विद्या बालन Video व्हायरल

...आणि हॉटेलच्या खिडकीतून उतरली विद्या बालन Video व्हायरल

महान गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावरच्या एका चित्रपटात विद्या शकुंतला देवीची भूमिका करत आहे.

  • Share this:

 मुंबई 17 नोव्हेंबर :बॉलीवुड स्टार  (Bollywood Actress) विद्या बालन (Vidya Balan) सध्या तिच्या आगमी मॅथेमॅटिशियन शकुंतला देवी (Shakuntala Devi) यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. यातलाच विद्या बालनचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. विद्या बालननेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ टाकलाय. यात ती एका खिडकीतून रुममध्ये येताना दिसत आहे. या व्हिडीओवरून लोकांनी तिला खूप प्रश्न विचारले आणि टोलेही लगावलेत. विद्या बालनने Instagramवर हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की मुंबईतल्या शीलीमार हॉटेलमध्ये मला हा माझा आवडता सीन करण्याची प्रेरणा दिली. हा व्हिडीओ मजेशीर असून लोकांनी त्यांला चांगलीच पसंती दिलीय. आणि विनोदी कमेंटही केल्या आहेत. महान गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या आयुष्यावरच्या एका चित्रपटात विद्या शकुंतला देवीची भूमिका करत आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

अनु मेनन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून सान्या मल्होत्राही या चित्रपटात विद्या बालनसोबत झळकणार आहे. ही भूमिका करणं हे आव्हानात्मक असल्याचं विद्याने म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 17, 2019, 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading