Video : सर्जिकल स्ट्राइकवरचा पहिला सिनेमा, पहा चित्तथरारक ट्रेलर

Video : सर्जिकल स्ट्राइकवरचा पहिला सिनेमा, पहा चित्तथरारक ट्रेलर

सर्जिकल स्ट्राईक भारतासाठी मोठं पाऊल होतं. त्यावरच आता सिनेमा तयार झालाय. सिनेमाचं नाव आहे 'उरी'. या सिनेमाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं.

  • Share this:

मुंबई, 5 डिसेंबर : सर्जिकल स्ट्राईक भारतासाठी मोठं पाऊल होतं. त्यावरच आता सिनेमा तयार झालाय. सिनेमाचं नाव आहे 'उरी'. या सिनेमाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं.

सिनेमाचं ट्रेलर अंगावर शहारा आणतं. विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमात विकी कौशल पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत आहे. या सिनेमासाठी विकीनं बरीच मेहनत घेतलीय.

सिनेमातले डायलाॅग दमदार आहेत. 'वक्त आ गया है खून का बदला खून से लेने का'सारखे डायलाॅग भारी आहेत. हा ट्रेलर प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करतो.

विकीनं आपल्या व्यक्तिरेखेसाठी लष्कराचं ट्रेनिंग घेतलंय. त्यासाठी रोज 4 ते 5 तास घाम गाळलाय. विकीनं भूमिकेत खरेपणा यावा, यासाठी आपली एनर्जी लेव्हलही वाढवलीय.

विकी कौशलचा मसान सिनेमा खूप गाजला होता. तो नेहमीच आॅफबिट भूमिका करतो. लस्ट स्टोरीज, राजी, मनमर्जिया, बाँबे वेलवेट अशा सिनेमांमधल्या त्याच्या भूमिका लक्षात राहिल्या.

पाकिस्ताननं उरी सेक्टरमध्ये 18 सप्टेंबर 2016ला हल्ला केला होता. त्याच्या 11 दिवसांनंतरच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. 29 सप्टेंबर 2016ला भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सीमेत तीन किलोमीटर आतपर्यंत घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं.

सीमेजवळच्या गावातील भारतीय नागरिकांचे काही नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतात. नियंत्रण रेषेपासून 4 किमी अंतरावरील दुधनियाल या खेडेगावातील मुख्य बाजारातून दोन प्रत्यक्षदर्शींनी काही इमारती आगीत भस्मसात झाल्याचे पाहिले. येथील अलहवाई ब्रिज शेवटचे ठिकाण आहे जिथे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व साहित्य पुरवले जाते.

भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण परिसराला घेरलं होतं. सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून नेण्यात आले. जवळच्या गावांमध्ये हे सर्व मृतदेह दफन करण्यात आल्याचंही समोर आलं होतं. रात्री दोन वाजल्यापासून ते पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन ते चार तास हल्ला सुरू होता असंही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं.

Video : लग्नात परिणितीने लपवले निकचे बूट आणि किती रुपये मागितले पाहा...

First published: December 5, 2018, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading