मुंबई, 28 जुलै : बॉलिवूड पुन्हा एकदा शोकसागरात बुडाले आहे. 2020 वर्षात बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. 115 सिनेमांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्या 86 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून आजाराशी झूंज देत असलेल्या या अभिनेत्रीचे आज निधन झाले. कुमकुम यांनी प्रसिद्ध अभिनेते गुरु दत्त आणि किशोर कुमार यांच्या बरोबर काम केले होते. मदर इंडिया, कोहिनूर, उजाला, एक सपेरा एक लुटैरा यांसारख्या प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या. नावेद जाफरी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.
नावेद जाफरी याने त्याच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'आपण आणखी एक मौल्यवान हिरा गमावला आहे. मी बालपणापासून यांना ओळखतो. त्या आमच्यासाठी कुटूंबातीलच होत्या. त्या कमालीच्या कलाकार आणि एक चांगली व्यक्ती होत्या. तुमच्या आत्म्यास शांती लाभो कुमकुम आंटी'.
(हे वाचा-नात आणि सुनेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महानायकाला कोसळलं रडू!)
We have lost another gem. I have known her since I was a kid and she was family, a superb artist and a fantastic human being, innalillahe wa innailaihe raajeoon. Rest in peace kunkum aunty 🙏 #ripkumkum #kumkum pic.twitter.com/CT60alQbOC
— Naved Jafri (@NavedJafri_BOO) July 28, 2020
22 एप्रिल 1934 रोजी बिहारमधील शेखपुरा (आताचे) मध्ये कुमकुम यांचा जन्म झाला होता. त्यांचे मुळ नाव जेबुनिस्सा (Zaibunnissa) होते. त्यांचे वडील हुसैनाबादचे नवाब होते. कुमकुम यांना गुरुदत्त यांनी शोधले असे म्हटले जाते. गुरुदत्त यांनी त्यांचा चित्रपट आर पार (1954) मधील गाणं 'कभी आर कभी पार लागा तीरे नजर'चे शूटिंग अभिनेता जगदीप यांना घेऊन करायचे होते. त्यांना नंतर वाटले की कोणत्यातरी स्त्री पात्राला घेऊन हे गाणे चित्रित व्हायला हवे. तेव्हा गुरुदत्त यांन कुमकुम यांना घेऊन या गाण्याचे शूटिंग केले होते.
(हे वाचा-'सुशांतला न भेटलेली माणसंही आज वाद घालत आहेत', सोनू सूदने साधला कंगनावर निशाणा!)
मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या त्यांच्या बंगल्याचे नाव देखील 'कुमकुम' असे होते. कालांतराने याठिकाणी हा बंगला तोडून इमारत उभारण्यात आली होती.