VIRAL: हेमा मालिनी यांचा हा जुना VIDEO सोशल मीडियावर जबरदस्त हिट, तुम्ही देखील व्हाल थक्क
युट्युबवर या व्हिडीओला आतापर्यंत 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक चाहते हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत असून त्यांच्या सौंदर्याचं, डान्सचं कौतुकही करत आहेत.
मुंबई, 4 डिसेंबर : बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी गेल्या अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. जगभरात आजही त्यांचे लाखो चाहते आहेत. त्या केवळ अभिनेत्रीच नाहीत तर एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहेत आणि त्यांनी अनेकदा रंगमंचावर आपली कला सादरही केली आहे. त्यांचा एक जुना भरतनाट्यम करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर आला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. ही व्हिडिओ क्लिप 1968 मधील असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या महिन्यात 72 वर्षांच्या झालेल्या हेमामालिनी, यांची मुलगी अहना देओल व्होरा हिनी नुकताच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. त्यामुळे त्या सध्या खूप आनंदात आहेत. हेमामालिनी त्यांच्या नातवाबरोबर व्हिडीओ गेम खेळतानाचा व्हिडिओ अहनानी काही दिवासांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केला होता.
आता त्यांचा एक जुना भरतनाट्यम करतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान गाजतो आहे. ‘A clip from L'inde Fantôme by Louis Malle.1969.’ असं कॅप्शन याला दिलं आहे. युट्युबवर या व्हिडीओला आतापर्यंत 2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक चाहते हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत असून त्यांच्या डान्सचं कौतुकही करत आहेत.
याआधी ईशाने दुर्गा पूजा उत्सवातील एक फोटो शेअर केला होता त्यामध्ये ईशा, हेमामालिनी आणि अहना तिघीही भरतनाट्यम करताना दिसत होत्या.
हेमामालिनींनी 1968 मध्ये राज कपूर यांच्यासोबत सपनो का सौदागर या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर सीता और गीता, शोले आणि बागबानसारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत.