मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'दिलीप कुमार यांची तब्येत नाजूक, त्यांच्यासाठी प्रार्थना करा', सायरा बानो यांची चाहत्यांना विनंती

'दिलीप कुमार यांची तब्येत नाजूक, त्यांच्यासाठी प्रार्थना करा', सायरा बानो यांची चाहत्यांना विनंती

मागील काही वर्षांपासून दिलीप कुमार यांनी तब्येत ठिक (Dilip Kumar Health Update) नाही. सायरा बानो या अनेक वर्षांपासून आपल्या पतीची दिलीप कुमार यांची निष्ठेने काळजी, देखभाल करत आहेत.

  मुंबई, 7 डिसेंबर : बॉलिवूड ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि दिग्गज अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) ही बॉलिवूड जोडी सर्वांसाठीच प्रेमाचं एक प्रेरणादायी उदाहरण आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला 54 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही या दोघांचं प्रेम कायम आहे. मागील काही वर्षांपासून दिलीप कुमार यांनी तब्येत ठिक (Dilip Kumar Health Update) नाही. सायरा बानो या अनेक वर्षांपासून आपल्या पतीची दिलीप कुमार यांची निष्ठेने काळजी, देखभाल करत आहेत. सायरा बानो यांनी नुकतंच दिलीप कुमार यांची हेल्थ अपडेट दिली आहे. त्यांनी दिलीप कुमार यांची तब्येत सध्या नाजूक झाल्याचं सांगितलं आहे. त्यांची इन्मूनिटी अतिशय कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

  (वाचा - ‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम अभिनेत्रीचं कोरोनामुळे निधन)

  टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सायरा बानो यांनी सांगितलं की, सध्या दिलीप कुमार यांची तब्येत अतिशय अशक्त आहे. रोगप्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. अनेकदा ते हॉलपर्यंत येतात आणि लगेचच त्यांच्या खोलीत जातात. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं सायरा बानो यांनी चाहत्यांना म्हटलं आहे. 'मला त्यांची काळजी घ्यायला आवडतं. माझं त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे. त्यांची सोबत असणं आणि त्यांच्यासोबत राहणं हेच माझ्यासाठी खूप आहे' असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर्षी 2020 मध्ये, दिलीप कुमार यांच्या दोन भावांचं कोरोनामुळे निधन झालं होतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या