News18 Lokmat

लग्नानंतर लाज-शरम सोडून स्वातंत्र्याच्या गोष्टी करतेय सोनम !

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचं नुकतंच लग्न झालं आहे. तिच्या लग्नाच्या चर्चा कुठे संपत नाही तोच तिचा 'वीरे दी वेडिंग' या आगामी सिनेमातलं एक नवं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 21, 2018 08:18 PM IST

लग्नानंतर लाज-शरम सोडून स्वातंत्र्याच्या गोष्टी करतेय सोनम !

21 मे : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचं नुकतंच लग्न झालं आहे. तिच्या लग्नाच्या चर्चा कुठे संपत नाही तोच तिचा 'वीरे दी वेडिंग' या आगामी सिनेमातलं एक नवं गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यात लाज-शरम सोडून द्या असं म्हणत सोनम आणि करिना कपूर धम्माल करताना दिसत आहेत. हे नवीन गाणं वीरे दी वेडिंगच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात सोनम आणि करिनाच्या धम्माल मस्ती चाहत्यांनी त्याला चांगलीच पसंती दिली आहे.

या सिनेमाच्या नावाइतकंच या गाण्याचे बोलही धमाल आहे. 'लाज शरम' असं या गाण्याचे बोल आहेत. व्हाइट-नॉइड यांनी या गाण्याला लिहलं आहे तर जसलीन रॉयल आणि दिव्या कुमार यांनी हे गाण्याला गायल आहे. लाज शरम सोडून द्या आणि आता आम्हाला स्वातंत्र्य द्या असं या गाण्यातून सांगण्यात आलं आहे.

या सिनेमाला एकता कपूर आणि रिया कपूर या दोघींनी मिळून बनवला आहो. शशांक घोष हा या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. वीर वे वेडिंग चार मित्रांच्या आयुष्याची कथा आहे. लग्न आणि रिलेशनशिप याभोवती फिरणारी ही कथा आहे. लाज शरम सोडून आम्हाला फक्त स्वातंत्र्य द्या असं या गाण्यात सांगितलं आहे. त्यामुळे तरुणांच्या आवडत्या विषय असलेल्या या गाण्याला चाहके किती प्रतिसाद ते पाहणं महत्त्वाचं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 08:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...