मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

वरुण धवनची पत्नी नताशा दलालची लवकरच होणार OTT वर एन्ट्री! जाणून घ्या डिटेल्स

वरुण धवनची पत्नी नताशा दलालची लवकरच होणार OTT वर एन्ट्री! जाणून घ्या डिटेल्स

तरुणाईचा आवडता अभिनेता वरुण धवनची   (Varun Dhawan)  पत्नी  (Wife)  नताशा दलाल  (Natasha Dalal)  लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

तरुणाईचा आवडता अभिनेता वरुण धवनची (Varun Dhawan) पत्नी (Wife) नताशा दलाल (Natasha Dalal) लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

तरुणाईचा आवडता अभिनेता वरुण धवनची (Varun Dhawan) पत्नी (Wife) नताशा दलाल (Natasha Dalal) लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 5 डिसेंबर-    तरुणाईचा आवडता अभिनेता वरुण धवनची   (Varun Dhawan)  पत्नी  (Wife)  नताशा दलाल  (Natasha Dalal)  लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ही बातमी समोर येताच लोकांना प्रश्न पडू लागला की नताशा तिचा नवरा वरुणप्रमाणे अभिनय करणार का? नताशा दलाल एका फॅशन शोमध्ये दिसणार आहे. ती एक प्रसिद्ध फॅशन डिझाईनर आहे. या फॅशन शोमध्ये तिची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे. नताशाला नेहमीच फॅशन डिझायनिंगची आवड आहे. त्यामुळे आता ती तिचे फॅशन डिझायनिंगचे कौशल्य जगाला दाखवणार आहे. वधू- वरांचा पोशाख करेल डिझाइन - नताशा दलाल ज्या ओटीटी शोमधून पदार्पण करणार आहे त्याचे नाव आहे 'से येस टू द ड्रेस इंडिया'. या शोमध्ये ती वधू वराचा पोशाख डिझाईन करणार आहे. तसेच नताशाचे वेडिंग कलेक्शनही प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नताशा पहिल्यांदाच तिच्या वेडिंग कलेक्शनचे प्रदर्शन करणार आहे. हा शो जगभर पाहायला मिळतो. याबद्दल नताशा म्हणते, 'मला नेहमीच फॅशन डिझायनिंगबद्दल खूप प्रेम आहे आणि माझ्यासाठी ओटीटी पदार्पणाहून चांगले व्यासपीठ असू शकत नाही.' नताशा दलाल या शोचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिने आपल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की एखाद्या वधूसाठी तिचा आवडता पोशाख डिझाईन करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत नताशा कॅमेऱ्यासमोर येणं खूप मोठं आहे. कारण ती अनेकदा कॅमेरा टाळते. आता सर्वजण नताशाच्या या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. शो डिस्कव्हरी प्लसवर प्रक्षेपित होईल. 2021 च्या सुरुवातीला वरुण धवन आणि नताशा यांनी एकत्र येत लग्नगाठ बांधली होती. हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण वरुणने नताशासोबत अगदी साध्या पद्धतीने लग्न करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. वरुण-नताशा हे बालपणीचे मित्र आहेत आणि बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. वरुण अनेकदा आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (हे वाचा:अंकिता लोखंडे-विकी जैननं केलं रोमँटिक फोटोशूट!अभिनेत्रीला लाल साडीत पाहून चाहते  ) नताशा दलालने फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (FIT), न्यूयॉर्कमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे. २०१३ मध्ये ती भारतात परतली. देशात परतल्यानंतर नताशाने स्वतःचे डिझाईन हाऊस  सुरू केले आहे. नताशा दलाल लेबल असे तिच्या या फॅशन डिझाईन हाउसचे नाव आहे. हे वधू आणि लग्नाच्या पोशाखांसाठी लोकप्रिय आहे.
First published:

Tags: Entertainment, Varun Dhawan

पुढील बातम्या