Home /News /entertainment /

'सब बढिया, सब शानदार', Urvashi Rautela ने इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना शिकवलं हिंदी; पाहा VIDEO

'सब बढिया, सब शानदार', Urvashi Rautela ने इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना शिकवलं हिंदी; पाहा VIDEO

भारताच्या हरनाझ कौर संधू (Harnaz Kaur Sandhu Won title of Miss Universe 2021) हिने ही सौंदर्यस्पर्धा जिंकली आहे. दरम्यान या स्पर्धेची परीक्षक म्हणून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) इस्रायलमध्ये गेली आहे. यावेळी तिने इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंना हिंदी शिकवलं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 13 डिसेंबर: भारतीय कलाकार देश-विदेशात प्रवास करत असतात. तिथल्या सेलिब्रिटींची भेटही घेत असतात. भारतीय अभिनेत्री हॉलिवूडपटांत कामही करतात आणि तिथल्या अभिनेते-अभिनेत्रींसोबत आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात. पण भारतीय मॉडेल उर्वशी रौतेला हिने थेट इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचीच सदिच्छा भेट घेतली आहे. तिच्या या भेटीमुळे ती चर्चेत आली आहे. मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) ही स्पर्धा यंदा इस्रायलमध्ये पार पडली. भारताच्या हरनाझ कौर संधू (Harnaz Kaur Sandhu Won title of Miss Universe 2021) हिने ही सौंदर्यस्पर्धा जिंकली आहे. दरम्यान या स्पर्धेची परीक्षक म्हणून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) इस्रायलमध्ये गेली आहे. यावेळी उर्वशीने इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना (Benjamin Netanyahu) हिंदी शिकवण्याचं काम या छोट्याशा भेटीत केलं आहे. उर्वशी रौतेला ही बॉलिवूड स्टार आणि मॉडेल आहे. ती इस्रायलमध्ये आहे त्यामुळे नेतान्याहूंना भेटली आणि तिने त्यांना हिंदू धर्मातील महत्त्वाचा ग्रंथ भगवद्गीता नेतान्याहूंना भेट दिला. हा फोटो देखील तिने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांनी तिचं खूप कौतुकही केलं.
उर्वशीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे तोही खूप चर्चेत आहे. या व्हिडीओत उर्वशी नेतान्याहूंना हिंदी शिकवताना दिसत आहेत. या व्हिडीओत नेतान्याहू म्हणाले की, 'मी तुम्हाला हिब्रु शब्द शिकवतो तुम्ही मला हिंदी शब्द शिकवा. जेव्हा आम्ही ‘सबाबा’ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असतो ‘सगळं मस्त चाललंय’, हा हिब्रु भाषेतला शब्द तर नाही पण आम्ही तो नेहमी वापरतो. सगळं मस्त चाललंय ला हिंदीत काय म्हणतात?’ उर्वशी उत्तर देते,‘ सब शानदार, सब बढिया.’ त्यानंतर नेतान्याहु हिंदीत सब शानदार सब बढिया इतकं अस्खलित म्हणतात की ते पाहून उर्शवी आश्चर्यचकित होते आणि टाळ्या वाजवून त्यांच्या प्रयत्नाचं कौतुक करते.
एका छोट्या भेटीत झालेला हा संवाद प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकरी अनेक प्रतिक्रियाही देत आहेत. उर्वशीने आंतरराष्ट्रीय नेत्याला भेट म्हणून भगवद्गीता दिली, ही तिची निवड खूप जणांना आवडली होती आणि त्याबद्दल नेटकऱ्यांनी तिचं प्रचंड कौतुकही केलं होतं.
First published:

Tags: Urvashi rautela

पुढील बातम्या