'हम्टी शर्मा की...'फेम सिद्धार्थच्या कारला विचित्र अपघात

चानक कारवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला. त्याच्या कारच्या अपघातानंतर जवळपास पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2018 11:18 PM IST

'हम्टी शर्मा की...'फेम सिद्धार्थच्या कारला विचित्र अपघात

मुंबई, 21 जुलै : 'बालिका वधू' आणि 'दिल से दिल तक' मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला कार अपघातातून थोडक्यात बचावलाय. कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे समोरील तीन वाहनांना धडक देत कार डिव्हाडरवर जाऊन आदळली. सिद्धार्थकडे बीएमडब्ल्यूची एसयूव्ही कार आहे. याच कारने तो जात असताना अपघात घडला. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईतील ओशिवरा परिसरात हा अपघात घडला.

'जीएसटी'त झाला बदल, 'या' 36 वस्तू झाल्या स्वस्त !

ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केलाय या घटनेत कारचे नुकसान झाले.  या घटनेनंतर सिद्धार्थला मोठा धक्का बसलाय. सिद्धार्थने टीव्ही आणि सिनेमात काम केलंय. अलीकडेच त्याने हम्टी शर्मा की दुल्हनिया सिनेमात काम केलंय.

नवी शंभराची नोट आरबीआयला पडली 100 कोटींना !

लोखंडवाला ओशिवरा सिटीजन असोसिएशनने टिे्वटरवर दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हा मेगा माॅलहुन कारने जात होता. अचानक कारवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला. त्याच्या कारच्या अपघातानंतर जवळपास पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात. सुर्दैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2018 11:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close