फ्लॅशबॅक 2017 : वाद, विरोधांमुळे गाजलं बाॅलिवूडचं वर्ष !

फ्लॅशबॅक 2017 : वाद, विरोधांमुळे गाजलं बाॅलिवूडचं वर्ष !

अनेक वाद आणि विवादामुळे बाॅलिवूडवर वादाचे ढग यंदाही कायम राहिले.

  • Share this:

26 डिसेंबर : 2017 हे बाॅलिवूडसाठी कही खुशी कही गम असंच राहिली. अनेक वाद आणि विवादामुळे बाॅलिवूडवर वादाचे ढग यंदाही कायम राहिले. कुठे सिनेमा फ्लाॅप झाले तर कुठे सिनेमेचं प्रसिद्ध होऊ दिले नाही. एकंदरीतच बाॅलिवडूकरांसाठी कसं राहिलं 2017 याचा हा आढावा..

पद्मावती

१) संजय लीला भन्साळीने जेव्हा पसून पद्मावती हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती, तेव्हा पासून करणी सेनेनं चित्रपटाला विरोध करायला सुरुवात केली होती. अजूनपर्यंत हा वाद सुरूच आहे. भन्साळी सोबतच चित्रपटातील कलाकार दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, शाहिद कपूर यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. १डिसेंबर ला रिलीज होणारा हा चित्रपट अनिश्चितकाळ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.

कपिल-सुनील ग्रोव्हर वाद

२) विनोदवीर कपिल शर्मासाठी २०१७ हा वर्ष उतार-चढावपूर्ण राहिला. एप्रिल महिन्यात त्याच आणि त्याचा सहकलाकार सुनील ग्रोव्हर यांचं एका फ्लाईटमध्ये भांडण झालं होतं. सांगितलं जातंय की, त्यावेळी कपिलने अती-मद्यप्राशन केलं होतं. यानंतर सुनील ग्रोव्हर ने कपिलचा शो सोडून गेला होता. त्यानंतर कपिलने सोशल मीडियावर सुनील ची माफीही मागितली होती. परंतु सुनील ग्रोव्हर ची नाराजी काही कमी झाली नव्हती.

कंगना VS करण जोहर

३)कंगना राणावतसाठी हे वर्ष जास्त व्यस्त नसलं तरी ती चर्चेत कायम राहिली. याच कारण की तिने करण जोहरच्या शोमध्ये जाऊन त्याला नेपोटीज्म चा सगळ्यात मोठा फॅक्टर सांगितलं. त्यावेळी करणं काही बोलला नाही परंतु त्यानंतर त्याने आयफा अवॉर्ड्समध्ये कंगनाच्या त्या वक्तव्याची खूप खिल्ली उडवली. नंतर त्याने याबद्दल माफी मागितली ती वेगळी गोष्ट.

सोनू निगम-अजान

४) सोनू निगमने एक ट्विट केलं होतं ज्यात त्याने त्याच्या घराजवळील मस्जिदमध्ये पहाटे होणाऱ्या लाऊड-स्पिकरवरील अजानवर आक्षेप नोंदवलं होतं. त्यानंतर सोनू निगमवर धर्मविरोधी असल्याचं आरोप लावण्यात आलं. एका मौलानानी तर सोनूच टक्कल करण्याची धमकी देऊन टाकली. हा वाद इतका पेटला होता शेवटी सोनूनेच मीडिया समोर स्वतःच मुंडन केलं.

नवाजुद्दीन सिद्दीकीच आत्मचरित्र

५) नवाजने त्याचं आत्मचरित्र लिहलं होतं. त्या आत्मचरित्र्याला   'एन ऑर्डनेरी लाईफ' असं नाव देण्यात आलं. परंतु प्रकाशित होण्या आधीच त्याला ते पुस्तक मागे घ्यावं लागलं. त्याच कारण म्हणजे नवाजच्या प्रेयसीने त्याच्यावर आरोप लावला की, त्याने त्याच्या पुस्तकात स्त्रियांचं चारित्रहनन केलं आहे. त्यामुळे नवाज चांगल्याच  वादात अडकला होता.

ऋषी कपूर आणि भारतीय महिला क्रिकेट संघ

६) नेहमी कोणताही वाद ओढावून घेणारे ऋषी कपूर यावर्षात चांगलेच चर्चेत राहिले. २०१७ मध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमने इतिहास रचला होता. पूर्ण देश त्यांचं कौतुक करत होतं. त्यात अतिउत्साहात येऊन ऋषी कपूरने ट्विट केलं की, 'लॉर्ड्सच्या मैदानावर सौरव गांगुली ने कृत्याचा पुनरावृत्ती व्हावी. याच अर्थ २००२ साली नेटवेस्ट सिरीज दरम्यान गांगुली ने शर्ट काढला होता मग त्याची पुनरावृत्ती व्हावी. त्यांच्या या टि्वटमुळे नेटीझन्सने संताप व्यक्त करत चांगलेच झोडपून काढले होते.

पहरेदार पिया की

७)या मालिकेमध्ये एका ८ वर्षाच्या मुलाचा एक मुलगी पाठलाग करते आणि त्याचे फोटो घेते त्यासोबतच हनिमून करताना पण दाखवण्यात आलं. त्यामुळे या मालिकेवर खूप टीका झाली आणि शेवटी ही मालिका बंद झाली.

 मलिक दुआ- अक्षय कुमार

८)अक्षय कुमारने एका टीव्ही शो दरम्यान आपली सहकलाकार मल्लिका दुआ हिच्यावर अभद्र टिप्पणी केली होती. त्यामुळे मलिकाच्या वडिलांना अक्षयकुमारच्या विरोधात सोशल मीडियावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मलिक आणि अक्षयची पत्नी ट्विंकल यांनी या वादात उडी घेतली होती.

सलमान -शिल्पा

९)ही घटना अगदी ताजीच आहे. सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांचे वेग वेगळे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यात सलमान खानने शिल्पाला हिणवत जातीवाचक शब्दांचा वापर केला होता. यानंतर वाल्मिकी समाजाच्या संघटनेने सलमान आणि शिल्पाच्या  विरोधात आंदोलन करत गुन्हा दाखल केला होता.

First published: December 25, 2017, 11:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading