VIDEO : टायगर श्रॉफचा डान्स पाहून नोरा फतेहीने दिलं चॅलेंज

VIDEO : टायगर श्रॉफचा डान्स पाहून नोरा फतेहीने दिलं चॅलेंज

अभिनेता टायगर श्रॉफने सोशल मीडियावर डान्सचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे तो प्रचंड व्हायरल होत आहे. हा डान्स पाहून प्रसिद्ध मॉडेल आणि डान्सर नोरा फतेहीने टागरला चॅलेंज दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 डिसेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता टायगर श्रॉफ अॅक्शनसोबतच डान्समध्येसुद्धा तरबेज आहे. टायगर त्याच्या जिमचे आणि डान्सचे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर शेअर करत असतो. यावेळी त्याने मॉडेल आणि डान्सर नोरा फतेहीच्या 'दिलबर' गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

नोरा फतेही मोरोक्कनची प्रसिद्ध डान्सर आणि मॉडेल आहे. आत्तापर्यंत ती 'दिलबर' गाण्यावर दोन वेगवेगळ्या भाषेत थिरकली आहे. हिंदी आणि अरबी अशा दोन भाषेतील गाण्यावर तिने डान्स केला आहे. नोरा कमालीची डान्सर असून तिलाही सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर करायला आवडतं. नोराने नुकताच 'सत्यमेव जयते' या चित्रपटातील 'दिलबर' गाण्यावर डान्स केला होता. तिनेच परफॉर्म केलेल्या 'दिलबर' गाण्यावर जेव्हा दुसरं कोणी सेलिब्रिटी तिच्याहीपेक्षा सुंदर नाचतं तेव्हा नोराच्या रिअॅक्शन काही वेगळ्याच असतात.

इन्स्टाग्रामवर टायगरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. टायगरच्या डॅशिंग स्टेप पाहून नोराला त्यावर कमेंट करण्याचा मोह काही आवरता आला नाही. नोराला टायगरचा हा डान्स प्रचंड आवडल्यामुळे उत्साहाच्या भरात कौतुक करत तिने टायगरला डान्सचं चॅलेंजही दिलं आहे.

टायगरच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. पण आता दोन उत्तम डान्सरमध्ये डान्सचा सामना होणार का ते पाहायचं आहे.

 

View this post on Instagram

 

❤barrr #choreoby my main man @piyush_bhagat @swainvikram @shaziasamji

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगर श्रॉफ सध्या करण जोहरच्या 'स्टुडंट आफ द ईअर-2' या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्यामुळे सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

First published: December 21, 2018, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading