मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ऐश्वर्याला प्रपोज करण्यासाठी अभिषेकने केलं होतं असं काही, जाणून व्हाल चकित

ऐश्वर्याला प्रपोज करण्यासाठी अभिषेकने केलं होतं असं काही, जाणून व्हाल चकित

बॉलिवूड कपल्सच्या लव्ह स्टोरीजबद्दल (Bollywod Couple Love Stories) फॅन्सना बरीच उत्सुकता असते. ते प्रेमात कसे पडले, कुणी कुणाला प्रपोज केलं, त्यांची अंगठी कशी होती,साखरपुडा कसा झाला अशा अनेक गोष्टींची जाम उत्सुकता असते. बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेतही आपलं प्रेम, लग्न टिकवून ठेवणाऱ्या जोडप्यांबद्दल कमालीचा आदर व्यक्त केला जातो.

पुढे वाचा ...

  मुंबई, 31 मे -   बॉलिवूड कपल्सच्या लव्ह स्टोरीजबद्दल (Bollywod Couple Love Stories) फॅन्सना बरीच उत्सुकता असते. ते प्रेमात कसे पडले, कुणी कुणाला प्रपोज केलं, त्यांची अंगठी कशी होती,साखरपुडा कसा झाला अशा अनेक गोष्टींची जाम उत्सुकता असते. बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेतही आपलं प्रेम, लग्न टिकवून ठेवणाऱ्या जोडप्यांबद्दल कमालीचा आदर व्यक्त केला जातो. ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चन (Aishwarya RAi- Abhishek Bachchan) ही लोकप्रिय जोडीही त्यातलीच एक आहे. या जोडीच्या प्रेमाबद्दल, अफेअरबद्दल आजही चर्चा होतात. चित्रपटाच्या सेटवर या दोघांचं प्रेम जुळलं आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्यच एकमेकांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला 15 वर्षं होऊन गेली आहेत. पण त्यांचं अफेअर आणि लग्नाबद्दल आजही तितकीच उत्सुकता आहे. झी न्यूजच्या वेबसाईटवर याबद्दल वृत्त देण्यात आलं आहे.

  बॉलिवूडमधलं इतकं श्रीमंत कपल. एक मिस वर्ल्ड तर दुसरा महानायकाचा मुलगा आणि अभिनेता म्हणजे त्यांची गिफ्टही महागडीच असणार. प्रपोज करताना अभिषेकनं ऐश्वर्याला हिऱ्याची अंगठी वगैरे घातली असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा...कारण ऐश्वर्यासारख्या (Aishwarya Rai) मिस वर्ल्डला प्रपोझ करताना अभिषेकनं (Abhishek Bachchan) चक्क खोटी अंगठी दिली होती. पण तिला खोटी अंगठी का घातली याचं कारणही अभिषेकनं सांगितलं आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र ‘गुरु’ फिल्मचं शूटिंग करत होते. हे दोघही स्टार शूटिंगमध्ये इतके बिझी होते की अंगठी घ्यायला जायलाही अभिषेकला वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे त्याने शूटिंगमध्ये वापरण्यात येणारी खोटी अंगठी देऊनच ऐश्वर्याला प्रपोज केलं. टोरांटोमध्ये फिल्मचा प्रीमियर झाल्यावर हॉटेल रुमच्या बाल्कनीत अभिषेकनं ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं, असं सांगितलं जातं.

  (हे वाचा:माधुरी दीक्षित, दिशा पाटनीनंतर आता मलायकाचा व्हिडीओ VIRAL, काय आहे नेमकं चॅलेंज? )

  14 जानेवारी 2007 रोजी मुंबईत या दोघांचा साखरपुडा झाला. बच्चन कुटंबियांच्या (Abhishek Bachchan) मुंबईमधील बंगला ‘जलसा’ बंगल्यातच त्यानंतर तीनच महिन्यांनी म्हणजे 20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या आणि अभिषेकचं ( Aishwarya And Abhishek Marriage ) लग्न झालं. ऐश्वर्या वयानं अभिषेकपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर हे कपल हनिमूनसाठी जवळपास एक महिना युरोपला गेलं होतं. लग्नानंतर चार वर्षांनी 16 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांच्या मुलीचा जन्म झाला. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या मुलीचं नाव आराध्या आहे.

  ऐश्वर्या आणि अभिषेकनं पहिल्यांदा 2000 साली ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटादरम्यान या दोघांच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं होतं. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2003 साली या दोघांनी ‘कुछ ना कहों’ हा चित्रपट एकत्र केला. 2005 साली ऐश्वर्यानं ‘बंटी और बबली’ या चित्रपटात एक आयटम साँग केलं होतं. या गाण्याच्या शूटदरम्यानच आपण एकमेकांना आवडतो हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर ‘उमराव जान’, ’गुरु’ आणि ‘धूम 2’ या चित्रपटांतही ते एकमेकांसोबत दिसले. आता गेली बरीच वर्षे हे दोघं एकमेकांसोबत मोठ्या पडद्यावर दिसलेले नाहीत; पण लवकरच या दोघांनी एकत्र काम करावं अशी त्यांच्या फॅन्सची इच्छा आहे.

  First published:

  Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Bollywood News, Entertainment