मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bollywood Throwback: जेव्हा कॅमेऱ्यासमोरच फाटला होता नर्गिस यांचा फ्रॉक; लाजून अभिनेत्रीने केलं होतं असं काही...

Bollywood Throwback: जेव्हा कॅमेऱ्यासमोरच फाटला होता नर्गिस यांचा फ्रॉक; लाजून अभिनेत्रीने केलं होतं असं काही...

मनोरंजनसृष्टीत कलाकारांना विविध परिस्थितींमध्ये शूटिंग करावं लागतं. अशावेळी सेटवर अनेक घटनादेखील घडतात. बऱ्याचवेळा अभिनेत्रींना सेटवर अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीदेखील घडतात.

मनोरंजनसृष्टीत कलाकारांना विविध परिस्थितींमध्ये शूटिंग करावं लागतं. अशावेळी सेटवर अनेक घटनादेखील घडतात. बऱ्याचवेळा अभिनेत्रींना सेटवर अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीदेखील घडतात.

मनोरंजनसृष्टीत कलाकारांना विविध परिस्थितींमध्ये शूटिंग करावं लागतं. अशावेळी सेटवर अनेक घटनादेखील घडतात. बऱ्याचवेळा अभिनेत्रींना सेटवर अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीदेखील घडतात.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 13 ऑगस्ट:  मनोरंजनसृष्टीत कलाकारांना विविध परिस्थितींमध्ये शूटिंग करावं लागतं. अशावेळी सेटवर अनेक घटनादेखील घडतात. बऱ्याचवेळा अभिनेत्रींना सेटवर अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीदेखील घडतात. असाच काहीसा प्रकार ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्यासोबतसुद्धा घडला होता. त्या घटनेने नर्गिस दत्त यांना फारच अस्वस्थ केलं होतं. परंतु या अभिनेत्रीने प्रसंगावधान राखत ती परिस्थिती सांभाळून घेतली होती. नर्गिस दत्त या हिंदी सिनेसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत.त्यांनी अनेक तुफान गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'मदर इंडिया' सारख्या चित्रपटाने त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती.या चित्रपटानंतर त्यांच्याजवळ अनेक मोठमोठ्या चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. नर्गिस दत्त या ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांच्या पत्नी आणि संजय दत्तच्या आई आहेत. 1960 मध्ये नर्गिस या 'दिन और रात' या चित्रपटाचं शूटिंग करत होत्या.परंतु काही कारणास्तव या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. त्यामुळे सेटवरील सर्व साहित्य आणि पोशाख पॅक करून ठेवण्यात आले होते.त्यानंतर तब्बल 6 वर्षानंतर म्हणजेच 1966 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आलं होतं. चित्रपटाचं शूटिंग भर पावसात सुरु झालं होतं. एक सीनदरम्यान नर्गिस यांनी शॉर्ट फ्रॉक परिधान केला होता.परंतु पावसामुळे त्यांचा फ्रॉक पूर्णपणे भिजला होता. अशातच त्यानां एक सीन शूट करावा लागला. हा सीन असा होता, ज्यामध्ये नर्गिस यांना एक दार ठोठावताना दाखवण्यात आलं होतं.परंतु त्यावेळी नर्गिस यांचा पाय मुरगळला आणि त्या थेट दरवाज्यावर जाऊन आदळल्या, यातच त्यांचा फ्रॉक फाटला.त्यांना काही क्षण आपल्यासोबत नेमकं काय घडलं? हे समजलं नाही.परंतु लगेचच त्यांनी स्वतः ला सावरलं. आणि एक भिंतीच्या आडोश्याला उभ्या राहिल्या.त्यांनंतर स्पॉटबॉयने त्यांना टॉवेल आणून दिला.आणि त्यांनी ही परिस्थिती सांभाळून घेतली.महत्वाचं म्हणजे या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. (हे वाचा: Disha Patani Sister: दिशा पाटनीची हुबेहूब कार्बन कॉपी आहे बहीण खुशबू; करतेय देशसेवा) नर्गिस दत्त यांनी एक बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी 'तलाश-ए-हक' या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती.परंतु एक अभिनेत्री म्हणून त्यांची कारकीर्द 'तमन्ना' या चित्रपटापासून सुरु झाली होती. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने 1981 मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. दुर्दैवाने या आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली होती.
First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment

पुढील बातम्या