Home /News /entertainment /

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अशी झाली होती नीतूंची अवस्था, स्वतःला सावरण्यासाठी घेतली 'या' गोष्टीची मदत

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अशी झाली होती नीतूंची अवस्था, स्वतःला सावरण्यासाठी घेतली 'या' गोष्टीची मदत

बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) सध्या रिअॅलिटी शो जज करत आहेत. या शोमध्ये त्यांचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय. मुलगा रणबीरच्या (Ranbir Kapoor) लग्नातही नीतू कपूर त्यांच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत होत्या.

    मुंबई,24 मे-    बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) सध्या रिअॅलिटी शो जज करत आहेत. या शोमध्ये त्यांचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय. मुलगा रणबीरच्या (Ranbir Kapoor) लग्नातही नीतू कपूर त्यांच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत होत्या. दरम्यान, त्यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. परंतु, पुन्हा कामावर परतल्याने नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत झाली, असं अलीकडेच एका मुलाखतीत नीतू यांनी सांगितलं. नीतू म्हणाल्या, “‘जुग जुग जिओ’ (Jug Jugg Jeeyo) चित्रपटामध्ये काम करणं हा एक सुखद अनुभव होता. याशिवाय मी दोन रिअॅलिटी शोदेखील केले, ज्यामुळे मला प्रेक्षकांशी संवाद साधण्यास मदत झाली. मी आता या क्षणाचा आनंद घेत आहे." हेल्थ शॉट्स वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नीतू म्हणाल्या, “आयुष्य तुम्हाला मजबूत बनवतं. जेव्हा तुम्ही चढ-उतारांमधून जाता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा आपल्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळ आहे. पण माझ्या मते तोच काळ सर्वोत्तम असतो, कारण तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यासाठी देव तुम्हाला मजबूत बनवत असतो. मी माझ्या आयुष्यात बर्‍याच गोष्टींचा सामना केला आहे आणि कदाचित या गोष्टींनीच मला प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्यास सक्षम केलं आहे. मी नेहमीच स्ट्राँग राहिले आहे." 'डॉक्टर जे सांगत होते ते मला आधीच माहीत होतं' नीतू कपूर पुढे म्हणाल्या, “तुम्हाला जे काही वाटत असेल, तुमची कोणतीही समस्या असो, तुम्ही काहीतरी करायला हवं. तुम्हाला मानसिक आरोग्याच्या समस्या असल्यास, मानसोपचारतज्ज्ञांना भेटा. पती गमावल्यानंतर मीही एका सायकॉलॉजिस्टकडे (Psychologist) गेले. मी डॉक्टरांचा सल्ला घ्यायची, पण नंतर मी विचार केला की डॉक्टर जे सांगत आहेत त्यापेक्षा मी जास्त मजबूत आहे. डॉक्टर मला आधीच माहीत असलेल्या गोष्टी करायला सांगत होते, म्हणून मला वाटलं, मी स्वतः ते का करत नाही? आणि म्हणून, मी डॉक्टरांना भेटणं बंद केलं आणि स्वतःला आणखी मजबूत केलं." 'जुग जुग जिओ'मध्ये दिसणार नीतू कपूर ल्युकेमिया (Leukemia) म्हणजेच कॅन्सरशी दोन वर्षांच्या लढाईनंतर 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. नीतू कपूर यांचा शेवटचा चित्रपट 2013 मध्ये आलेला अॅक्शन कॉमेडी 'बेशरम' होता. या चित्रपटात त्या मुलगा अभिनेता रणबीर कपूर आणि पती ऋषी कपूर यांच्यासोबत दिसल्या होत्या. ऋषींच्या मृत्यूनंतर नीतू कपूर अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसल्या. लवकरच नीतू धर्मा प्रॉडक्शनच्या राज मेहता दिग्दर्शित 'जुग जुग जिओ' चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 24 जून रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात अनिल कपूर नीतूच्या पतीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोहली यांच्याही भूमिका आहेत.
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment

    पुढील बातम्या