'माझ्यासोबत जे घडलं त्याला फक्त नाना पाटेकरच जबाबदार नाहीत तर...'

तनुश्री म्हणते माझ्या कुटुंबाला जो त्रास झाला तो तुमच्याही कुटुंबाला होईल.

  • Share this:

अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी #Metoo मोहिमेंतर्गत नाना पाटेकर, गणेश आचार्य, राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि राखी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली होती. तनुश्रीने पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

बॉलीवूडमध्ये #MeToo ची सुरूवात करणारी तनुश्री तिच्या नव्या वक्तव्याने चर्चेत आली आहे. ती म्हणाली की, मी स्वत: हॉर्न ओके प्लिजसाठी गणेश आचार्यचे नाव सुचवले होते. पण जेव्हा मला मदतीची गरज होती तेव्हा त्यांनी मदत केली नाही.

पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत चार जणांची नावे आहेत. माझं शोषण फक्त नाना पाटेकरांनी केलं नाही तर त्यात ते चारही जण असल्याचा दावा तनुश्रीनं केला आहे.

तनुश्री म्हणते की, मी 24 वर्षांची असताना बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचे स्वप्न बघत होते. पण या प्रकरणानंतर गणेश आचार्यने माझ्याबद्दल इंडस्ट्रीत चुकीची माहिती पसरवली. त्याचा माझ्या करिअरवर परिणाम झाला.

तनुश्रीने राखी सावंतला तिच्या विरोधात उभा केल्याचा आरोप गणेश आचार्यवर केला आहे. दहा वर्षापूर्वी आणि 6 महिने आधी जे काही झालं त्यामागे गणेश आचार्यांचा हात असल्याचं तनुश्रीनं म्हटलं आहे.

इतकी बदनामी होऊनही मी आज जिवंत आहे. राखी सावंत, गणेश आचार्य, नाना पाटेकर, राकेश सारंग, सामी सिद्दीकी यांनी शाप देते असं म्हणत त्यांच्या कुटुंबियांना देखील मानसिक त्रास भोगावा लागेल असं वक्तव्य केलं. माझ्या कुटुंबाला जो त्रास झाला तो तुमच्याही कुटुंबाला होईल असे तनुश्री म्हणाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 02:49 PM IST

ताज्या बातम्या