मुंबई, 19 डिसेंबर : सिनेमात जशी भूमिका मिळते, तो कलाकार बऱ्याचदा खऱ्या आयुष्यातही तसाच वागत असतो. आता तापसी पन्नू नेहमीच आक्रमक व्यक्तिरेखा साकारत असते. तिचा पिंक असो, नाही तर बेबी. खऱ्या आयुष्यातही तापसीला असाच अनुभव आला.
तापसी पन्नूला एका ट्विटर युजरनं ट्रोल केलं. त्यानं लिहिलं, Tapsee i love your body parts. मला तुझ्या शरीराचे अवयव आवडतात. त्यावर तापसीनंही रोखठोक उत्तर दिलं. ती म्हणाली, अरे वा, मला पण आवडतात. तुम्हाला कुठला आवडतो? मला माझा सेरेब्रम आवडतो. सेरेब्रम म्हणजे मेंदू.
अशा प्रकारचं उत्तर देऊन तिनं त्या युजर्सचं तोंडच बंद केलं. ट्विटरवर सगळ्यांनी तापसीचं कौतुकही केलं.
Wow! I like them too. BTW which is your favourite ? Mine is the cerebrum. https://t.co/3k8YDbAL64
— taapsee pannu (@taapsee) 17 December 2018
Aap ne ladke ki bolti band kr di.. Feel proud aaj ki girls ko aise hona chahiye.. Keep it up ❤❤
— Vivek Singh(INDIAN) (@VivekRaghuwansi) 17 December 2018
तापसीने आत्तापर्यंत तेलगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी अशा 30हून अधिक सिनेमात कामं केलं आहे.बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताच तिने मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे ती कोटी लोकांची आवड बनली आणि त्यामुळे तिला कमी वेळात खूप प्रसिद्धी मिळाली.
तापसीचा नाना पाटेकरांसोबतचा तडका सिनेमा येणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमारबरोबर मिशन मंगलमध्ये दिसणार आहे. अलिकडे अभिषेक बच्चनसोबत तिचा मनमर्झिया रिलीज झाला होता.
PHOTOS : ही आहे मिस युनिव्हर्सची पहिली ट्रान्सजेंडर स्पर्धक
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा