मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'काम देण्याच्या आमिषाने बलात्कार' भूषण कुमारवर लागलेल्या आरोपांवर T-Series ने दिली पहिली प्रतिक्रिया

'काम देण्याच्या आमिषाने बलात्कार' भूषण कुमारवर लागलेल्या आरोपांवर T-Series ने दिली पहिली प्रतिक्रिया

टी-सिरीजचा (T- Series) मेनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर (Bhushan Kumar) एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा (Rape Case) गंभीर आरोप लावण्यात आला आहे.

टी-सिरीजचा (T- Series) मेनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर (Bhushan Kumar) एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा (Rape Case) गंभीर आरोप लावण्यात आला आहे.

टी-सिरीजचा (T- Series) मेनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर (Bhushan Kumar) एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा (Rape Case) गंभीर आरोप लावण्यात आला आहे.

मुंबई, 17 जुलै- गीतकार गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी-सिरीजचा (T- Series) मेनेजिंग डायरेक्टर भूषण कुमारवर (Bhushan Kumar) एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा (Rape Case) गंभीर आरोप लावण्यात आला आहे. तसेच मुंबईमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ही माहिती समोर येताच भूषण कुमारकडून टी सिरीजने एक निवेदन  जाहीर केला आहे. त्यामध्ये त्यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. डीएननगर पोलीस ठाण्यात भूषण कुमारविरुद्ध आयपीसी कलम 376,420 आणि 506 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भूषण कुमारवर आरोप झाल्यानंतर आणि तक्रार दाखल केल्यानंतर टी सिरीजने एक निवेदन जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, ‘मि. भूषण कुमारवर केलेले सर्व आरोपांचं आम्ही खंडन करतो आणि तरुणीवर काम देण्याच्या आमिषाने 2017 ते 2020 अत्याचार केल्याच्या आरोपात काहीचं तथ्य नाही’. असं त्यांनी म्हटलं आहे.

(हे वाचा: तक्रार करण्याचाही वैताग आलाय’; समीर विद्वांसनं केली रंगभूमी सुरु करण्याची मागणी)

तसेच यामध्ये पुढं लिहलं आहे, ‘आमच्या रेकॉर्डनुसार त्या तरुणीने आधीचं टी सिरीजच्या अल्बम आणि चित्रपटात काम केलं आहे. 2021 मध्ये ती तरुणी आपल्या एका वेबसिरीजसाठी मदत मागण्यासाठी भूषण कुमारजवळ आली होती. त्या वेबसिरीजची ती निर्मिती करणार होती. मात्र तिला पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर जून 2021 मध्ये महाराष्ट्रात लॉकडाऊन उठल्यानंतर ती तरुणी आपल्या साथीदाराच्या मदतीने टी सिरीजकडून मोठी रक्कम मागत होती.

(हे वाचा-अभिनेत्रीचं 19 व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; सांगितला धक्कादायक अनुभव)

टी सिरीजने आपल्या जाहीरनाम्यामध्ये पुढ म्हटलं आहे, की या तरुणीविरुद्ध 1 जुलै 2021ला आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता. पुराव्यासाठी काही ऑडिओ रेकॉर्डिंग आणि काही मेसेज पोलिसांना देण्यात आले होते. अशामध्ये त्या तरुणीने केलेली बलात्काराची तक्रार हे दुसर काही नसून त्या घटनेचाचं बदला असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी आम्ही आमच्या वकिलांशी बोलत असून, पुढे योग्य तो कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Rape case