मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ती सध्या काय करते? एका अपघाताने बदललं 'आशिकी गर्ल' अनु अग्रवालचं आयुष्य.....

ती सध्या काय करते? एका अपघाताने बदललं 'आशिकी गर्ल' अनु अग्रवालचं आयुष्य.....

1990 मध्ये महेश भट्ट (Mahesh Bhatt) दिग्दर्शित ‘आशिकी’(Aashiqui) चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून अनु अग्रवाल(Anu Agrwal)  ही अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 15 मे- 1990 मध्ये महेश भट्ट (Mahesh Bhatt) दिग्दर्शित ‘आशिकी’(Aashiqui) चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातून अनु अग्रवाल(Anu Agrwal)  ही अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाली होती. या चित्रपटाने अनुला मोठं स्टारडम मिळवून दिलं होतं. मॉडेल असणाऱ्या अनुनं बॉलिवूडमध्ये पहिल्याचं चित्रपटात मोठं यश संपादन केलं होतं. मात्र हे फार काळ नाही टिकू शकलं. एका अपघातात अनुचं आयुष्यचं बदलून गेलं. तिला ओळखणं सुद्धा कठीण झालं होतं. ही ‘आशिकी गर्ल’ सध्या काय करते आपण पाहणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by anu aggarwal (@anusualanu)

अनु अग्रवाल बॉलिवूड पासून दूर असली तरी, ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आणि सतत सकारात्मक गोष्टी चाहत्यांसाठी शेयर करत असते. अनु अग्रवालने सध्या ‘योग’ लाच आपलं आयुष्य बनवलं आहे. ती स्वतः योगा करते. आणि लहान मुलांना योगा शिकवायचं काम देखील करते. चित्रपटांपासून दूर जाऊन अनुनं असं आयुष्य स्वीकारलं आहे.

View this post on Instagram

A post shared by anu aggarwal (@anusualanu)

‘आशिकी’ चित्रपटाच्या यशानंतर अनुला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. इतकचं नव्हे तर चक्क हॉलिवूड मधून सुद्धा अनुला ऑफर येऊ लागल्या होत्या. आशिकी नंतर अनुने काही वर्षे चित्रपटांत काम केल होतं. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टी पासून दूर जात. योगामध्ये रमण्यास सुरुवात केली होती. मात्र या काळात त्यांचा मोठा अपघात झाला. आणि या अपघाताने त्या कोमात गेल्या होत्या. जवळजवळ एक महिना त्या कोमात होत्या.

(हे वाचा: सई ताम्हणकर ते पल्लवी पाटील या मराठी अभिनेत्री झाल्या पतीपासून विभक्त)

कोमातून बाहेर आल्यानंतर समजलं, की त्यांच्या चेहऱ्यात मोठा बदल झाला आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितल होतं, की कोमातून बाहेर आल्यानंतर त्यांचे बिफोर आणि अफ्टर असे फोटो व्हायरल होत होते. आणि हे सर्व बघून त्यांना मोठा धक्का बसला होता.

(हे वाचा:‘नाईलाजानं करावा लागतो मेकअप’; सई ताम्हणकरनं व्यक्त केली खंत  )

असे खुपचं कमी लोक असतात. जे इतक्या मोठ्या दुर्घटनेतून बाहेर पडून एक सकारात्मक आयुष्य जगतात. आणि अनु त्यामधीलचं एक आहे. अनु सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. आणि सतत ती आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करणारे व्हिडीओ आणि पोस्ट शेयर करत असते. चाहत्यांकडून सुद्धा या पोस्टना भरभरून प्रतिसाद मिळत असतो.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment