• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • कपूर कुटुंबांच्या होणाऱ्या सुनेचा हॉट अंदाज; पाहा तारा सुतारियाचा BIKINI LOOK

कपूर कुटुंबांच्या होणाऱ्या सुनेचा हॉट अंदाज; पाहा तारा सुतारियाचा BIKINI LOOK

‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ (Student Of The Year 2) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ताराने खुपचं कमी वेळेत आणि कमी वयात मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 जुलै- अभिनेत्री तारा सुतारीया (Tara Sutaria) ही सोशल मीडियावर खुपचं चर्चेत असते. कधी ती आपल्या हॉट फोटोंमुळे तर कधी आपल्या लव्हस्टोरीमुळे नेहमीचं सर्वांचं लक्ष वेधून घेते. ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ (Student Of The Year 2) मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ताराने खुपचं कमी वेळेत आणि कमी वयात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तरुणाईमध्ये तारा खुपचं प्रसिद्ध आहे. ती सतत आपल्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच ताराने सोशल मीडियावर काही हॉट बिकिनी फोटो (Share Bikini Photo) शेयर करत पुन्हा एकदा सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by TARA💫 (@tarasutaria)

  अभिनेत्री तारा सुतारीया नेहमीचं चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सतत आपल्या पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहतेदेखील भरभरून प्रतिसाद देत असतात. नुकताच ताराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही हॉट फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये खुपचं हॉट दिसून येत आहे. ताराच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. ताराने आपल्या या बोल्ड अंदाजाने पुन्हा एकदा सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे. (हे वाचा:कपिल शर्मा शोमधून सुमोना बाहेर? एका एपिसोडसाठी घेत होती तब्बल इतके पैसे  ) ताराने ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यामध्ये ती टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकदेखील झालं होतं. तसेच ती मरजावांन, तडप या चित्रपटांतदेखील झळकली आहे. मात्र तिने एक बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती पहिल्यांदा ‘बिग बडा बूम’ या डिस्नेच्या शोमध्ये दिसली होती. तसेच तिने वेल डन निक्की, द सूट लाईफ ऑफ करण एंड कबीर, ओए जस्सी अशा अनेक शोमध्ये बालकलाकार म्हणून दिसून आली होती. (हे वाचा:Captain India: कार्तिक आर्यनने केली नव्या चित्रपटाची घोषणा; अभिनेता बनणार PILOT) तसेच तारा आपल्या लव्हस्टोरीमुळेसुद्धा बरीच चर्चेत असते. तारा कपूर कुटुंबातील एका मुलाला डेट करत आहे. तारा आदर जैनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं वारंवार म्हटलं जातं. ती कपूर कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात आदरसोबत दिसून येते. त्यामुळे या गोष्टी वर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: