बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना 'हे' काय झालं?

बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना 'हे' काय झालं?

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, किंग खान शाहरूख खान आणि दिलीप कुमार तिघंही सध्या आजारी पडले आहेत.

  • Share this:

07 ऑगस्ट: सध्या बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना कुणाची नजर लागली आहे की काय असं वाटतंय. कारण एकामागोमाग एक बॉलिवूडचे सुपरस्टार्स आजारी पडत आहेत. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, किंग खान शाहरूख खान आणि दिलीप कुमार तिघंही सध्या आजारी पडले आहेत.

आमिर खानच्या पाणी फाउंडेशनचा रविवारी पु्ण्यात पुरस्कार वितरण सोहळा होता. पण तो या कार्यक्रमाला हजर राहू शकला नाही कारण त्याला स्वाइन फ्लू झाला आहे. त्याला एकट्यालाच नाही तर त्याची पत्नी किरण रावलाही स्वाइन फ्लू झाला आहे. तो कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी सामील झाला. त्याच्याऐवजी या कार्यक्रमाला शाहरूख खान उपस्थित होता.

तर या कार्यक्रमाला आलेल्या शाहरूखची परिस्थितीही खूप चांगली नाही. त्याची तब्येत बिघडली नाही तरी तो जखमी झाला आहे. कोलकात्याला जब हॅरी मेट सेजलच्या प्रमोशनसाठी जात असताना त्याला कंबरेवर दु:खापत झाली आहे. या जखमेचं ड्रेसिंग करायला त्याला डॉक्टरांकडेही जावं लागलं. तसंच पाठीच्या दु:खण्यानेही तो सध्या त्रस्त असतो.

हे दोन्ही सुपरस्टार अशा परिस्थितीत असतानाच एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा दिलीप कुमारही सध्या आजारी पडला आहे. त्यांना किडनीच्या समस्येचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

हे तिन्ही स्टार लवकरात लवकर बरे होवो हीच त्यांच्या फॅन्सची इच्छा आहे.

First published: August 7, 2017, 3:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading