शेतात राबणाऱ्या मुलींचा VIDEO पाहून गहिवरला सोनू सूद, उतरवलं खांद्यावरचं जोखड

शेतात राबणाऱ्या मुलींचा VIDEO पाहून गहिवरला सोनू सूद, उतरवलं खांद्यावरचं जोखड

शेतकऱ्याने त्या मुलींना शिक्षणासाठी पाठवावं, मी शेतात बैल पाठवून देतो असं सोनू सूदने म्हटलं आहे.

  • Share this:

हैदराबाद 26 जुलै: लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या हजारो मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद हा देवदूत ठरला आहे. त्याच्या मदतीच्या कहाण्या देशभर गाजत आहेत. हजारो मजुरांना त्याने आपल्या घरी पोहोचविण्यासाठी मदत केली. तसच त्यांना जेवणही पुरवलं. आता सोनू सूद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाऊन गेलाय. आंध्र प्रदेशात शेतात राबणाऱ्या मुलींचा VIDEOपाहून त्याने त्या शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतातल्या अनेक भागात अजुनही पेरण्या सुरू आहेत. आंध्र प्रदेशातल्या चित्तुर जिल्ह्यात एका शेतकरी आपल्या मुलींना घेऊन पेरणी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या शेतकऱ्याजवळ बैल नसल्याने त्याने पेरणी करतांना आपल्या मुलींनाच पेरणी यंत्र ओढायला लावलं होतं.

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने त्याला मुलींनाच पेरणीसाठी जुंपलं असल्याचं दिसून येत होतं. त्या दृश्यांमुळे सोनू सूद हेलावून गेला. त्याने लगेच ट्विट करत उद्या सकाळी या शेतकऱ्यांच्या शेतात बैल जोडी असेल असं सांगितलं.

शेतकरी हा देशाचा महत्त्वाचा घटक असून शेतकऱ्याने त्या मुलींना शिक्षणासाठी पाठवावं, मी शेतात बैल पाठवून देतो असं त्याने ट्विटरवरून जाहीर केलं. सोनू सूदच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मुंबईचे होणार का वांदे? विमानाचं तिकीट देऊनही मजुरांचा परतायला नकार

दरम्यान सोनू आता सोशल मीडियावर गेल्या एक दोन दिवसात व्हायरल झालेल्या 'वॉरिअर आजीं'ची मदत करणार आहे. त्याने या आजीबाईंची सविस्तर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे मदतीची घोषणा देखील केली आहे. या ट्वीटमध्ये सोनू असे म्हणाला आहे की, 'या आजींबरोबर एक प्रशिक्षण शाळा उघडायची आहे ज्याठिकाणी त्या देशातील महिलांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देतील'

विशेष म्हणजे या आजींनी दोन सिनेमामध्येही काम केले आहे. मात्र परिस्थितीने पुन्हा त्यांना रस्त्यावर खेळ करायला भाग पाडले.  मुली-नातवंडांसह 18 जणांच कुटुंब त्या सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. रितेश देशमुख, सोनू सूद यांसारखे अनेक जण या आजींच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 26, 2020, 5:54 PM IST
Tags: Sonu Sood

ताज्या बातम्या