मुंबई, 29 डिसेंबर- बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला (Shahrukh Khan) फॅनचा तोटा नाही. त्याचा प्रत्येक सिनेमा पाहण्यासाठी चाहते अतुरतेने वाट पाहत असतात. झिरो चित्रपटानंतर आता शाहरुख तब्बल चार वर्षांनी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाच्या (pathan )सेटवरील एक फोटो समोर आला आहे. त्याचा हा फोटो पाहून चाहत्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आपल्या आवडत्या स्टारला शूटिंग करताना पाहणे ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. सोशल मीडियावर देखील या फोटोची चर्चा रंगलेली आहे.
'पठान' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्थ
अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्थ आहे. चित्रपटाच्या सेटवरील शाहरूखचा हा फोटो चाहत्यांना सुखावणारा आहे. सगळे स्टार सध्या न्यू ईअर वीकेंड साजरा करण्यात व्यस्थ आहेत. दुसरीकडे शाहरूख मात्र त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्थ आहे. चाहते आपल्या आवडत्या स्टार मोठ्या गॅपनंतर पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
वाचा-'BBM3'चा विजेता होताच विशाल निकमला सांगलीकरांनी दिलं खास सरप्राइजसेटवरील शाहरूखचा फोटो व्हायरल
शाहरूखच्या काही फॅन पेजनी दावा केला आहे की, त्याचा हा फोटो 'पठाण' सिनेमाच्या सेटवरचा आहे. या फोटोत शाहरुखने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. तसेच या फोटोत शाहरुखसोबत आसाममधील अभिनेता दिगंत हजारिकाही देखील दिसत आहे. ज्याने हिंदी आणि आसाम अशा दोन्ही चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या फोटोवरून असा अंदाज बांधला जात आहे की, दिगंतही या चित्रपटाचा एक भाग असण्याची शक्यता आहे.
आसामी अभिनेता दिगंताने केला होता फोटो शेअर
दिगंताने सर्वप्रथम इन्स्टा हँडलवर फोटो पोस्ट केला होता आणि त्याला कॅप्शन दिले होते की, "यश हा चांगला शिक्षक नसतो तर अपयश तुम्हाला नेहमी नम्र बनवते. शाहरुखची प्रशंसा करताना त्याने लिहिले होते, बॉलिवूडचा सर्वात यशस्वी अभिनेता असला तरीही सर्वात नम्र व्यक्ती. दिगंत यांनी ही पोस्ट नंतर डिलीट केली
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.