VIDEO ... आणि सलमान खानच्या तोंडातून निघाली आग!

VIDEO ... आणि सलमान खानच्या तोंडातून निघाली आग!

प्रत्येक चित्रपटात सलमानचा अंदाज हा काही वेगळाच असतो. फक्त सलमान आहे म्हणून त्याचा चित्रपट पाहणाऱ्यांचही संख्याही प्रचंड आहे.

  • Share this:

मुंबई 14 नोव्हेंबर : सलमान खानचा चित्रपट येणार म्हटल्यावर त्याची चर्चा ही खूपच आधीपासून सुरू होते. प्रत्येक चित्रपटात सलमानचा अंदाज हा काही वेगळाच असतो. फक्त सलमान आहे म्हणून त्याचा चित्रपट पाहणाऱ्यांचही संख्याही प्रचंड आहे. या प्रेक्षकांना फक्त सलमानला बघायचं असतं. त्यांना इतर कुठल्याही गोष्टींशी देणं घेणं नसतं. आता चर्चा आहे ती सलमानच्या दबंग 3 ची. या दबंग3चं गाणं नुकतचं रिलीज झालं असून त्यात सलमानच एक वेगळाच अंदाज असल्याने चाहत्यांनी हे गाणं डोक्यावर घेतलंय. 'हुड हुड दबंग' हे गाणं बॉलिवूडमधल्या गाजलेल्या काही गाण्यांमधलं एक गाणं आहे. अजुनही या गाण्यावर तरुणाई थिरकताना दिसून येते.

राखी सावंतच्या 'नकली पती'ला मेट्रोमध्ये महिलांनी बदडलं VIDEO व्हायरल

दबंग 3मध्येही सलमा एका वेगळ्या रुपात येणार असल्यानं सगळ्यांनाच प्रतिक्षा होती की सलमान नेमका आहे कसा. त्याची झलक या गाण्यात दिसून येतेय. फक्त काही दिवसांमध्ये या गाण्याला YouTubeवर 10 मिलियन वेळा पाहिलं गेलंय. चुलबूल पांडेने हे गाणं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलंय. या गाण्यात सलमान त्याच्या तोंडातून आग बाहेर काढतो. त्याची ही अॅक्शन प्रेक्षकांना आवडली असून त्यांच्या कृतीचं चाहत्यांनी कौतुकही केलंय. 20 डिसेंबरलाहा चित्रपट रिलीज होणार आहे.

VIDEO : तरुणीने बाहुबलीच्या गालात मारली 'थप्पड', त्यानंतर नेमकं काय घडलं...

आपल्या नृत्यासाठी ओळखला जाणारा प्रभुदेवा दबंग 3 चा दिग्दर्शक आहे. अरबाज खान आणि निखिल द्विवेदी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. साजिद-वाजिद यांनी हे गाणं लिहिलं असून शबीना खान या गाण्याची कोरिओग्राफर आहे. जलीस शेरवानी आणि दानिश साबरी यांनी हे गाणं लिहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 03:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading