• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi च्या चावडीवर महेश मांजरेकरांसोबत दिसणार सलमान खान

Bigg Boss Marathi च्या चावडीवर महेश मांजरेकरांसोबत दिसणार सलमान खान

सलमान खान (salman khan) देखील मराठी बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर- बिग बॉस मराठीचं ( Bigg Boss Marathi 3  ) सध्या तिसरं पर्व सुरू आहे आणि या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉस मराठी महेश मांजरेकर होस्ट करतात. प्रत्येक आठवड्यात महेश मांजरेकरत चावडीवर येऊ स्पर्धांकांना चुकीच बरोबर सांगत त्यांची शाळा घेतात. तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीच 15 वं पर्वही सुरु आहे. याला म्हणावा तेवढा चांगला प्रतिसाद मिळत नाही. याच हिंदी बिग बॉसच्या मंचावर काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. तो भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आता सलमान खान (salman khan) देखील मराठी बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'अंतिम' या सलमान खानच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी चावडीकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले आहे. एका पोर्टलनं देखील यासंबंधी वृत्त दिलं आहे. वाचा : Video : 'तुमची मुलगी काय करते' या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी 12 वर्षांनी टीव्हीवर येतेय मधुरा वेलणकर महेश मांजरेकर यांच्यासोबत सलमान खानला चावडीवर पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. सलमान खानच्या येण्याने शोमध्ये रंगत तर येणारचं आहे. मात्र याही पेक्षा सलमानला या मंचावर घऱातील मंडळींच्या काय प्रतिक्रिया असणार याची देखील सर्वांना उत्सुकता लागली आहे.सलमान यापूर्वी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात हजेरी लावली होती. आता पुन्हा तो या पर्वात हजेरी लावणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे या आठवड्यात चावडीवर काय होणार हे पाहण्याचे उत्सुकतेचे ठरणार आहे.
  बिग बॉस मराठीच्या तीसऱ्या पर्वानं देखील प्रेक्षकांच्या मनात स्थान पक्क केलं आहे. गेल्या आठवड्यात स्नेहा वाघ घऱातून बाहेर पडली आहे. आता दिवसेंदिवस खेळ अधिक रंजक होत चालला आहे. या आठवड्यात प्रेक्षकांची कोणाला पसंती मिळतेय व कोण सेफ व कोण आऊट होतोय ते या आठवड्याच्या चावडीवरच समजणार एवढं नक्की.
  Published by:News18 Trending Desk
  First published: