मुंबई, 8 नोव्हेंबर: सलमान खानचा (Salman Khan) राग काय असतो हे अनेकदा सर्वांनी पब्लिक प्लेसमध्ये पाहिलं आहे. कधी ही सलमान चिडू शकतो व रागवू शकतो याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. नुकताच सलमान त्याच्या चाहत्यावर चांगलाच चिडला व सर्वांसमोरच त्याच्याावर राग काढला. सलमान एका कार्यक्रमात पोहचला होता. यावेळी सलमान माध्यमांना पोज देत होता तेव्हाच त्याचा एक चाहता सेल्फी घेण्यासाठी आला. सलमान पोज देत असतानाच चाहत्याने त्याच्या तोंडावरच सेल्फा काढण्यासाठी फोन धरला. हे पाहून सलमान त्याच्यावर चिडला.
सलमानसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहता त्याच्याभोवती वारंवार फोन सेट करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा सलमान खान त्याला म्हणाला, "थोडं नाचायचं थांबव." त्यानंतर चाहत्याने अखेर सेल्फी घेण्याचा नाद सोडून दिला व तेथून पळ काढला. यावेळी सलमान खान पांढऱ्या टी-शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये दिसला. याआधीही सलमान खानने अनेकवेळा चाहत्यांचा क्लास घेतला आहे.
View this post on Instagram
सलमान खान सध्या 'बिग बॉस 15' होस्ट करत आहे आणि 26 नोव्हेंबरला तो 'अंतिम: द फायनल ट्रुथ' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आयुष शर्मा पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सलमान खानचा 'अंतिम' चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनावेळी महेश मांजरेकर यांनी अलीकडेच सलमान खानच्या लग्नाबद्दल त्यांचे काय मत आहे हे स्पष्टपणे सांगितलं आहे.
वाचा : ...म्हणून माधुरी दिक्षितच्या मुलाने वाढवले होते केस, अभिनेत्रीने शेअर केला Video
सिद्धार्थ कनन यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर म्हणले होते की, 'काही गोष्टी आहेत ज्याबद्दल मी त्याच्याशी खुलेपणाने बोलू शकतो. दुसरा एकदा व्यक्ती त्याच्यासोबत अशा विषयावर बोलू शकत नाही. मी सलमानला सांगितले की, तू लग्न करत नाही हाच माझा एक प्रॉब्लेम आहे.महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, 'मला सलमान खानचा मुलगा बघायचा आहे. मला वाटते त्याने याचा विचार करावा. मी त्याच्याशी याबद्दल बोलू शकतो. मला असे वाटते की त्याला कोणाकडे तरी परत जावे लागेल. सुपरस्टार असतानाही तो सिंगल, एकटा आहे. त्यांना कोणाची तरी गरज आहे.
वाचा :हिमांशी खुराना पहिल्यांदाच असिमसोबतच्या नात्याबद्दल म्हणाली; ''लवकरच लग्न...''
एक तर सलमानला कोणताही असा मोठा किंवा महागडा शौक नाही. तो मुंबईत राहत असलेला फ्लॅट माझ्या मते एक बेडरूमचा फ्लॅट आहे. मी जेव्हा जेव्हा त्याच्या घरी जातो तेव्हा तो त्याच्या ड्रॉईंग रूममध्ये सोफ्यावर झोपलेला असतो. कधी कधी त्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा असं वाटतं की, एवढा यशस्वी झालेला माणसामागे एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस दडलेला असल्याचे मला दिसते, असे महेश मांजरेकर म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Salman khan