Elec-widget

सिनेमाच्या सेटवर प्रँक करण्यासाठी प्रसिद्ध आहेत 'हे' बॉलिवूड कलाकार!

सिनेमांच्या शूटिंग दरम्यान वेळ मिळेल तेव्हा प्रँक करण्याची कोणतीही संधी हे कलाकार सोडत नाहीत.

  • Share this:

बॉलिवूडमधील काही असे कलाकार आहेत ज्यांना प्रँक करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सिनेमांच्या शूटिंग दरम्यान वेळ मिळेल तेव्हा प्रँक करण्याची कोणतीही संधी हे कलाकार सोडत नाहीत. जाणून घेऊया कोण आहेत प्रँकसाठी प्रसिद्ध असलेले कलाकार...

'गोलमाल' स्टार अजय देवगण चेहऱ्यावरून जरी गंभीर दिसत असला तरीही शूटिंग दरम्यान प्रँक करण्यात त्याचा हातखंडा आहे. सन ऑफ सरदारच्या सेटवर त्यानं आपल्या सहकलाकाराला गाजरचा हलवा सांगून मिरचीची पेस्ट खायला लावली होती. तसंच त्यानं सर्वांना हे पटवून दिलं होतं की, ते ज्या घरात राहत होते ते घर भूताने झपाटलेलं आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन सुद्धा सेटवर खूप मस्ती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'हॅप्पी न्यू ईयर' सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी अभिषेकनं फराह खानचा फोन चोरून तिच्या फोनवरून स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी ट्वीट केल्या होत्या.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान शूटिंग दरम्यान सहकलाकारांची फिरकी घेण्यासाठी आणि प्रँक करण्यासाठी ओळखला जातो. 'अंदाज अपना अपना' सिनेमाच्या शूटिंगवेळी त्यानं रवीना टंडनची मस्कारी केली होती. ज्यामुळे ती खूप घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावर गरम कॉफी फेकण्याचं नाटकं त्यानं केलं होतं. अशाप्रकारची मस्कारी आमिरनं फक्त रवीना सोबतच नाही तर त्याची पत्नी किरण राव आणि 'दंगल' मधील सहकलाकार फातिमा सना शेख सोबतही केली होती.

खिलाडी अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वात मस्तीखोर अभिनेता मानला जातो. अभिनेत्री हुमा कुरशीच्या अनुभवानुसार अक्षय सेटवर कोणत्याही सहकलाकारचा फोन घेऊन त्याच्या फोनवरून लग्नाचं प्रपोजल पाठवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसंच एखाद्या व्यक्तिची कोणतीही चोरी पकडली गेली तर अक्षय त्या व्यक्तीची फिरकी घेतल्याशिवाय सोडत नाही.

Loading...

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सुद्धा मस्तीखोर स्वभावाचा आहे. त्याचा हा स्वभाव वेळोवेळी इंटरव्ह्यू आणि शूटिंग दरम्यान पहायला मिळतो. त्यानं आता पर्यंत सर्वात मोठं प्रँक हृतिक रोशनसोबत केलं होतं. त्यानं आपल्या सुंदर केसांचं रहस्य सांगताना तो केसांना कधीच शाम्पू लावत नाही असं सांगितलं होतं आणि विशेष म्हणजे हृतिकनंही यावर विश्वास ठेवला होता.

अभिनेत्री विद्या बालन शूटिंग दरम्यान प्रँक करण्यासाठी प्रसिद्ध आहे. टीन सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी ती नेहमी नवाझुद्दीन सिद्दीकीला तिनं खूप त्रास दिला होता. विचित्र एक्सप्रेशन्स देऊन विद्यानं नवाजला ती गोंधळवून टाकत असे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com