...आणि दीपिकाने कापली रणवीर सिंहची मिशी VIDEO व्हायरल

...आणि दीपिकाने कापली रणवीर सिंहची मिशी VIDEO व्हायरल

गेल्या काही महिन्यांपासून रणवीरने पिळदार मिशी ठेवली होती. त्याची ही मिशी तरुणांमध्ये खासच लोकप्रिय ठरली. रणवीरही अनेक समारंभांमध्ये आपल्या मिशीवर ताव मारत फटोसाठी पोज देत असे.

  • Share this:

मुंबई 17 नोव्हेंबर : अभिनेता रणवीस सिंह आणि दीपीका सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. या दोघांमधली केमेस्ट्रीही चांगलीच चर्चेत असते. दीपिका आणि रणवीरने नुकताच आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा केलाय. ते दोघं पहिले तिरुपती आणि नंतर सुवर्ण मंदिरात गेले होते. त्यानंतर त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायल होतोय. हा Video आहे मिशी कापण्याचा. गेल्या काही महिन्यांपासून रणवीरने पिळदार मिशी ठेवली होती. त्याची ही मिशी तरुणांमध्ये खासच लोकप्रिय ठरली. रणवीरही अनेक समारंभांमध्ये आपल्या मिशीवर ताव मारत फटोसाठी पोज देत असे. आता ही मिशीच कापल्याने रणवीरचा ले-आउटच बदलणार असल्याची चर्चाही सोशल मीडियावर होतेय.

'फिल्मी ज्ञान' च्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा Video शेअर करण्यात आलाय. यात रणवीर आणि दीपिका आनंदी मूडमध्ये असून दीपिका कैचीने रणवीरची मिशी कापताना दिसतेय. आणि रणवीरही त्याला हसून प्रतिसाद देतोय असं दिसत आहे.

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर-दीपिकाने नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मागच्या वर्षी 14 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या या शाही डेस्टीनेशन वेडिंगची सोशल मीडियावर खूप चर्चाही झाली. हे दोघंही पहिल्यांदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’मध्ये एकत्र दिसले आणि याच ठिकाणी त्याच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. जाणून घेऊयात त्याच्या लव्हस्टोरी बद्दल काही रंजक गोष्टी. ज्या त्यावेळी या सिनेमाच्या सेटवर असलेल्या क्रू-मेंबरनं शेअर केल्या.

दीपिका- रणवीरच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्री पेक्षा त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली. रणवीरनं दीपिकाला पहिल्यांदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पाहिलं होतं. पण या दोघांना पहिल्यांदा एकत्र आणलं ते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी. 2013 मध्ये आलेल्या ‘रामलीला’मध्ये हे दोघं प्रमुख भूमिकेत दिसले आणि याच ठिकाणी त्यांच्यात जवळीक वाढायला सुरुवात झाली होती. या सिनेमात अनेक रोमँटिक सीन आहेत. असं सांगितलं जातं की या सीनमध्ये हे दोघं अशाप्रकारे दंग होत असतं की दिग्दर्शकानं कट म्हटल्यावरही ते यातून बाहेर पडत नसत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या