मुंबई 27 जून: लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सगळेच व्यवहार ठप्प होते. कोरोनाचा प्रसार (Coronavirus) होण्याची भीती असल्याने बॉलिवूडमधलं शुटिंगही बंदच होतं. आता अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही अटींवर शुटिंगला परवानगी देण्यात येत आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची मुख्य अट घालण्यात आली आहे. त्यामुळे निर्मात्यांची शुटिंग करताना कसरत लागत आहे. या शुटिंगच्या काळात इंटीमेट सीन Intimate scene करताना सगळ्यात जास्त अडचण येणार असून नियमांचं पालन करत दोघांनाही जास्त जवळ जाऊ न देता कसं शुटिंग करायचं असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. अपारशक्ती खुरानाने (Aparshakti Khurana) Instagramवर एक फोटो शेअर करत त्याचा खुलासा केला आहे.
अपारशक्तीचा नवा चित्रपट हेल्मेट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलही असणार आहे. अपारशक्तीने जो फोटो शेअर केला त्यात प्रनुतनही असणार आहे. त्याने दोन फोटो शेअर केले असून त्यात पहिला फोटो रोमँटिक सीनचा आहे. तर दुसऱ्या फोटोत दोघांच्याही चेहेऱ्यावर फेस शिल्ड लावण्यात आले आहेत.
आता यापुढे असे सीन अशा प्रकारे शुट केले जाऊ शकतात असे संकेतच त्याने दिले आहेत. पण आपल्या चित्रपटाबद्दल तो निश्चिंत आहे. कारण त्याचा हा सीन लॉकडाऊन आधीच शुट झाला आहे. आता जर असा सीन शुट करायचा असेल तर असेच फेस शिल्ड लावावे लागतील असं त्याने म्हटलं आहे.
अपारशक्ती खुराना, प्रनूतन बहल, आशीष वर्मा आणि अभिषेक बनर्जी असे स्टार असलेल्या 'हेलमेट' चे निर्माते सतराम रमानी हे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Coronavirus