'सुशांतला न भेटलेली माणसंही आज वाद घालत आहेत', सोनू सूदने साधला कंगनावर निशाणा!

कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) असे म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील एक मोठा वर्ग आहे जो याचा फायदा उचलू इच्छितो

कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) असे म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील एक मोठा वर्ग आहे जो याचा फायदा उचलू इच्छितो

  • Share this:
    मुंबई, 28 जुलै : कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) आता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत (Sushant Singh Rajput) भाष्य केले आहे. त्याने असे म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील एक मोठा वर्ग आहे जो याचा फायदा उचलू इच्छितो. सुशांतच्या मृत्यूबाबत बोलताना सोनू निगमने कंगनाचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे. तो असं म्हणाला की, जे सुशांतला कधी भेटले देखील नाहीत ते या विषयावर वाद घालत आहेत. कंगनाने याआधीच्या तिच्या एका व्हिडीओमध्ये ही बाब स्विकारली आहे की, ती कधी सुशांतला भेटली नाही आहे किंवा त्याच्याशी तिने कधी बातचीत केली नाही आहे. 'मणिकर्णिका'मधील तिची सहकलाकार अंकिता लोखंडे ही सुशांतबरोबर 6 वर्ष रिलेशनशीपमध्ये होती. (हे वाचा-इंटिमेट सीन करताना आजही कापतात या अभिनेत्याचे हात, स्वत: केला होता खुलासा) सोनूने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केले आहे. दरम्यान 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या कंगनाच्या सिनेमामध्ये सोनू  सूदला देखील कास्ट करण्यात आले होते. 45 दिवस शूटिंग केल्यानंतर सोनूने हा सिनेमा सोडला होता. यावर नाराज कंगनाने अशी प्रतिक्रिया दिली होती की सोनू 'महिला दिग्दर्शका'च्या हाताखाली काम करू इच्छित नाही, त्यामुळे त्याने सिनेमा सोडला. मात्र सोनूने हे सर्व आरोप नाकारले होते. त्याने असा आरोप केला होता की, कंगनाने त्याचा रोल कापून अत्यंत छोटा केला होता म्हणून त्याने हा सिनेमा सोडला होता. (हे वाचा-नात आणि सुनेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महानायकाला कोसळलं रडू!) सुशांतने आत्महत्या का केली, याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्नांंची पराकाष्ठा करत आहेत. कंगनाने असा दावा केला होता की दिग्दर्शकांच्या दबावामुळे आणि इंडस्ट्रीमधील नेपोटिझममुळे सुशांत नैराश्यात होता. गेल्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी कंगनाच्या चौकशीसाठी समन्स जारी केले आहेत. त्याचप्रमाणे या आठवड्याच्या अखेरीस मुंबई पोलीस फिल्ममेकर करण जोहरची देखील चौकशी करू शकतात. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत 35 हून अधिक जणांची चौकशी झाली आहे. दरम्यान यामध्ये आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी यांसारखी काही हाय प्रोफाइल नावे देखील आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: