'मी पाकिस्तानात जन्म घ्यायला हवा होता', सोनू निगमचं वादग्रस्त वक्तव्य

म्युझिक कंपन्यांकडून कलाकारांबोबत भेदभाव केला जात आहे. त्यामुळे सध्या भारतात पाकिस्तानी कलाकारांना मिळणाऱ्या कामाबाबत सोनू निगमने सूर छेडला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2018 09:05 AM IST

'मी पाकिस्तानात जन्म घ्यायला हवा होता', सोनू निगमचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई, 19 डिसेंबर : कधी लाऊड स्पिकर तर कधी ट्विटर सोडण्याच्या विषयांमुळे चर्चेत येणारा सोनू निगम आता पुन्हा चर्चेत आला आहे. आपण पाकिस्तानमध्ये जन्माला यावं अशी इच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा त्याने वादग्रस्त विधान केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान सोनू निगमला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना तो म्हणाला की, रिमिक्स गाणी का तयार केली जातात? या मुद्द्यावरुन त्याने पाकिस्तानचा विषय काढला आहे.


'पाकिस्तानमध्ये जन्म घेतला असता तर बर झालं असतं कारण तेव्हाच कलाकारांना भारतात योग्य काम मिळालं असतं' असं सोनू निगमला वाटतं. यावरुन पाकिस्तानी कलाकारांना भारतात मिळणाऱ्या कामाबाबत सोनू निगमने सूर छेडला आहे.


एखादा शो करण्यासाठी सध्या गायकांनाच म्युझिक कंपन्यांना पैसे द्यावे लागतात. जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमचं गाणं लोकांपर्यंत पोहचणार नाही. जोपर्यंत तुमचं गाणं लोकांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रसिद्धी मिळत नाही. या म्युझिक कंपन्या अशाच गायकांना जास्त वेळ देतात जे त्यांना पैसा पुरवतात. असं सोनू निगमला वाटतं.

Loading...

त्याचबरोबर म्युझिक कंपन्या असा व्यवहार पाकिस्तानी कलाकारांसोबत करत नाही. या गोष्टीचा खरच आनंद आहे. पण मग भारतीय कलाकारांसोबत असा भेदभाव का केला जातो. असा प्रश्न सोनूला पडला आहे. आतिफ अस्लम हा माझा चांगला मित्र आहे. त्याच्याकडून किंवा राहत फतेह अली खान यांच्याकडून पैसे का मागितले जात नाही. असा मुद्दा सोनू निगमने मांडला आहे.


सध्या सिनेसृष्टीमध्ये उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. माझ्या बोलण्यावर जर विश्वास नसेल तर तुम्ही स्वत: याबाबत माहिती मिळवा. म्हणूनच रिमिक्सवर रिमिक्स गाणी येत आहेत. असे देखील सोनी निगम म्हणाला आहे.

VIDEO श्रीनगरचा सर्वांत थंड दिवस; दल लेक बर्फानं असा गोठला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...