ओरिजिनल की काॅपी ?, 'ही' गाणी आधीच गाजली नंतर सिनेमात आली !

ओरिजिनल की काॅपी ?, 'ही' गाणी आधीच गाजली नंतर सिनेमात आली !

अनेक अशी गाणी आहे जी आधी छोट्या पडद्यावर सुपरहीट झाली नंतर त्यांचा समावेश चित्रपटातही करण्यात आला.

  • Share this:

10 नोव्हेंबर : विद्या बालन आणि मानव कौल यांचा आगामी सिनेमा 'तुम्हारी सुलु' 17 नोव्हेंबरला रिलीज होतोय. विद्याच्या आरजे अवताराची सर्वत्र चर्चा आहे. पण आणखी एक म्हणजे 'बन जा तू मेरी रानी' हे गाणंही चांगलंच हीट झालंय. पण तुम्हाला माहिती आहे हे गाणं गुरु रंधावा यांनी वर्षभरापूर्वीच प्रसिद्ध केलं होतं. आताही जशाच तसे कोणतेही बदल न करता हे गाणं चित्रपटात घेण्यात आलंय.

असा प्रयोग आताच झाला नाही. याआधीही अनेक अशी गाणी आहे जी आधी छोट्या पडद्यावर सुपरहीट झाली नंतर त्यांचा समावेश चित्रपटातही करण्यात आला.

आधीचं 'बन जा तू मेरी रानी'

सिनेमातलं'बन जा तू मेरी रानी'

'हिंदी मीडियम' सिनेमातील 'तेनु सूट सूट करदा' हे गाणं आधी पार्टी आणि डिस्कोमध्ये हीट झालं होतं.

'तेनु सूट सूट करदा' -ओरिजिनल

सिनेमातलं 'तेनु सूट सूट करदा'

2017 मध्ये 'राब्ता' सिनेमातील मैं तेरा बाॅयफ्रेंड हे गाणं सुद्धा अशाच वादात अडकलं होतं. या गाण्यावर  गायक जे-स्टारने हक्क सांगितला होता. पण हे गाणं काही वर्षांपूर्वीच टी सिरीजने प्रसिद्ध केलं होतं. उलट टी सिरीजनेच हे गाणं चोरल्याचा आरोप जे स्टारवर केला होता. त्यानंतर जे स्टारने सपशेल माघार घेतली.

'मैं तेरा बाॅयफ्रेंड' -ओरिजिनल

अलीकडे आलेल्या 'बार बार देखो' सिनेमातील 'काला चश्मा' हे गाणं 2000 मध्ये अमर अर्शी यांनी गायलेलं भांगडा साँग आहे. हे गाणं इतकं सुपरहीट झालं होतं की लग्न, पार्टी या गाण्याशिवाय पूर्ण होत नव्हत्या.

ओरिजिनल 'काला चश्मा'

'की अँड का' सिनेमात हनी सिंगच्या 'हाई हील्स' गाण्याचा समावेश करण्यात आला. आधी हे गाणं 2012 मध्ये रिलीज करण्यात आलं होतं.

ओरिजिनल 'हाई हील्स'

ही झाली अलीकडच्या सिनेमाची यादी पण 1997 मध्ये 'प्यार कोई खेल नहीं' मध्ये पाॅप आयकाॅन फाल्गुनी पाठकचं गाणं 'याद पिया की आने लगी' याचा समावेश करण्यात आला होता.

ओरिजिनल 'याद पिया की आने लगी'

'याद पिया की आने लगी'

First published: November 10, 2017, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading