बॉलिवूडमधील 'ही' 10 लोकप्रिय गाणी, जी आहेत मूळ पाकिस्तानी गाण्यांची कॉपी!

बॉलिवूडमधील 'ही' 10 लोकप्रिय गाणी, जी आहेत मूळ पाकिस्तानी गाण्यांची कॉपी!

बॉलिवूडमध्ये अनेक गाण्यांचं म्यूझिक हे पाकिस्तानच्या गाण्यांतून घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे, जी पाकिस्तानी गाणी भारतात रिमेक करण्यात आली जी बॉलिवूमध्ये खूपच लोकप्रिय ठरली.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : आजकाल बॉलिवूडमध्ये जुनी गाणी रिक्रिएट करण्याचा ट्रेंड वाढला आहे. याशिवाय जगभारातील वेगवेगळ्या सिनेमांतील म्यूझिकलाही रिमेक करण्याचीही क्रेझ आहे. मात्र फार कमी लोकांना माहीत आहे की, बॉलिवूडमध्ये पाकिस्तानच्या अनेक गाण्यांचं म्यूझिक घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे, जी पाकिस्तानी गाणी भारतात रिमेक करण्यात आली जी बॉलिवूमध्ये खूपच लोकप्रिय ठरली. खूप कमी लोक असतील ज्यांना ‘बहुत प्यार करते है तुमको सनम’ हे गाणं आवडत नसेल. तसेच फार कमी लोकांना माहीत असेल की ही गझल आहे जी पाकिस्तानी गजल सम्राट मेहंदी हसन यांनी गायली आहे.

1. बहुत प्यार करते हैं तुमको सनम (साजन, 1991)- हे एक बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिया गाणं आहे. हे गातकार समीर यांनी लिलं असून नदीम-श्रवण यांनी त्याला संगीत दिलं आहे. मात्र याचं खरं संगीत पाकिस्तानी गझल बहुत खुबसूरत है मेरा सनम या गाण्याची होती. ज्यात समीर यांनी काही शब्द बदलण्याची मेहनत घेत हे गाणं रिक्रिएट केलं.

या Instagram सेलेब्रिटीची झाली खळबळजनक हत्या; सूटकेसमध्ये मिळाला मृतदेह

2. कितना प्यारा तुझे रब ने बनाया (राजा हिंदुस्तानी, 1996)- राजा हिंदुस्तानी हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर हे गाणं खूपच प्रसिद्ध झालं होतं. आजही हे गाणं वाजल्यावर लोकं गुनगुनायला सुरुवात करतात. मात्र याचं मूळ संगीत नुसरत फतह अली खान यांचं आहे. त्यांनी हे गाणं अनेक मंचांवर गायलं आहे. ‘किन्ना सोना तेनू रब ने बनाया’ अशा त्या मूळ गाण्याच्या ओळी आहेत.

3. धीरे-धीरे आप मेरे (बाजी, 1995) आमिर खान आणि ममता कुलकर्णी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलं होतं. याचं संगीत तयार केलं होतं प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी मात्र हे मूळ पाकिस्तानी गाणं 'रफ्ता-रफ्ता वो मेरे हस्ती के सामा बन गए' मेहंदी हसन यांनी गायलं होतं.

जेव्हा मोहम्मद रफींच्या एका गाण्यानं मुंबईतील एका मुलाचं अ‍ॅडमिशन होतं...

4. चोली के पीछे क्या है (खलनायक, 1993)- हे अनेक वर्ष भारतातील सर्वात लोकप्रिय गाणं ठरलं. हे गाणं सपना अवस्थी आणि अलका याज्ञीक यांनी गायलं होतं. संगीत होतं ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ यांचं. मात्र हे संगीत मूळ गाणं ‘रात दे बारह वज्जे’ याचं होतं.

5. मैं जिस दिन भुला दूं (पुलिस पब्लिक- 1990)- पुनम ढिल्लन हीचं हे गाणं लता मंगेशकर आमि अमित कुमार यांनी गायलं आहे. हे हिंदी गाणं आजहही खूप लोकप्रिय आहे. याचं संगीत राम-लक्षण यांनी बनवलं होतं. हे गाणं असद भोपाली यांनी लिहिलं आहे. मात्र हे मूळ संगीत 'मैं जिस दिन भुला दूं' या गाण्याचं आहे.

6. तू चीज बड़ी है मस्त-मस्त (मोहरा, 1994)- हे गाणं त्यावेळी एवढं लोकप्रिय झालं होतं की, बॉलिवूडमध्येच हे गाणं दोन वेळा रिक्रिएट करण्यात आलं. उदित नारायण और कविता कृष्‍णमुर्ती यांनी गायलेलं हे गाणं आनंद बख्शी यांनी लिहिलं होतं तर संगीत विजू शाह यांनी दिलं होतं. पण याचं संगीत नुसरत फतह अली खान यांची कव्‍वाली 'दम मस्त कलंदर'शी मिळतं जुळतं आहे.

बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडशी लग्न

7. मेरा पिया घर आया (याराना- 1981)- हे गाणं रिलीज झाल्यावर या गाण्याची खूपच क्रेझ होती. त्याकाळी भारतीतल हिंदी पट्ट्यातील अनेक पुरुष बाहेर गावी कामाला जात असत. त्यामुळे ते घरी परतल्यावर त्यांच्या बायका त्यांना हे गाणं ऐकवत असत. हे गाणं नुसरत फतह अली खान यांची कव्वाली 'मेरा पिया घर आया' वरून घेण्यात आलं आहे.

8. काला शा काला (आई मिलन की रात, 1991)- अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील या गाण्याला आनंद-मिलंद यांनी संगीत दिलं आहे. गाणं रिलीज झाल्यानंतर खूपच लोकप्रिय ठरलं. मात्र हे मूळ गाणं बाबर खान यांचं होतं.

9. सजना तेरे बिना (जुदाई, 1997)- नदीम-श्रवण यांचं हे गाणं पाकिस्तानी गायक नुसरत फतह अली खान यांची कव्वाली ‘सानु इक पल चैन न आवे’ वर आधारित आहे. एवढंच नाही तर हे गाणं पुन्हा एकदा ‘रेड’ सिनेमात वापरण्यात आलं.

परिणिती चोप्राला बॉयफ्रेंडनं दिला धोका, भावुक होत मुलाखतीत उलगडलं सत्य

10. दिल मेरा तोड़ दिया उसने (कसूर, 2001)- हे मूळ गाणं 'वो मेरा ना सका, बुरा क्यों मानूं'चं बॉलिवूड व्हर्जन आहे. हे मूळ गाणं पाकिस्तानी गायक नूर जहाँनं गायलं आहे.

=============================================================================

दोस्ती आहे ना भाऊ! उंदीर आणि मांजराचा मस्तीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 11:48 AM IST

ताज्या बातम्या