#EkLadkiKoDekhaTohAisaLaga: अनिल कपूरला सोनमकडून ही अपेक्षा कधीच नव्हती

#EkLadkiKoDekhaTohAisaLaga: अनिल कपूरला सोनमकडून ही अपेक्षा कधीच नव्हती

खऱ्या आयुष्यात वडील-मुलीचं नातं प्रेक्षकांना आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. खरतर पहिल्यांदाच अनिल आणि सोनम चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. पण सिनेमामध्ये सोनमची वडील अनिल कपूरवर नाराजी का दिसून येत आहे ते जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर आणि अनिल कपूर यांचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खऱ्या आयुष्यातील वडील आणि मुलीचं नातं प्रेक्षकांना आता मोठ्या पडद्यावर पाहयला मिळणार आहे. खरतर पहिल्यांदाच अनिल कपूर आणि सोनम कपूर सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

'इक लडकी को देखा तो एैसा लगा' चित्रपटाचा ट्रेलर नुकरताच लाँच करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटातील अनिल आणि सोनम यांच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू होती. ते रहस्य या ट्रेलरमधून उलघडलं आहे असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या आयुष्याप्रमाणे चित्रपटातही अनिक कपूर सोनमच्या वडिलांची भूमिका करत आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसून येत आहे की, सोनम लहानपणापासूनच लग्नाची स्वप्न बघत असते. मुलगी मोठी झाल्यावर घरात लग्नाचा विषय काढला जातो आणि मग घरातील सर्व मंडळी तिच्या लग्नाच्या तयारीला लागतात. पण सोनमला कोणा दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम असतं. चित्रपटातील सगळं व्टिस्ट या प्रेमातच गुंतलेलं आहे कारण चित्रपटात सोनम एका लेसबियन मुलीची भूमिका करत आहे.

अनिल कूपर सोनम कूपर यांच्यासोबतच राजकुमार राव, जुही चावलाही चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहेत. येत्या 1 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं एक नव्या कथेची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

First published: December 27, 2018, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading