मी परत येणारच, सोनालीचा नवा व्हिडिओ

मी परत येणारच, सोनालीचा नवा व्हिडिओ

ड्रामेबाज या शोचा ग्रँड फिनाले आहे. त्यानिमित्तानं सोनालीनं तिचा एक व्हिडिओ शूट करून सगळ्यांशी संवाद साधलाय.

  • Share this:

मुंबई, 04 आॅक्टोबर : सोनाली बेंद्रे सध्या न्यूयाॅर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेतेय. झीवरच्या ड्रामेबाजची जज असतानाच तिला तो शो सोडावा लागलेला. तिच्या जागी हुमा कुरेशी आली. आता या शोचा ग्रँड फिनाले आहे. त्यानिमित्तानं सोनालीनं तिचा एक व्हिडिओ शूट करून सगळ्यांशी संवाद साधलाय.

सोनाली बेंद्रेनं छोट्यांना शुभेच्छा तर दिल्यातच. पण तिनं सेटवरच्या सगळ्यांजवळ जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. कुणाला तिनं शूजचे फोटो काढून पाठवायला सांगितलेत, तर हुमा कुरेशीचेही आभार मानलेत. शिवाय मी परत येईन, असं आत्मविश्वासानंही तिनं म्हटलंय. हा व्हिडिओ नक्कीच मनाला स्पर्श करतो.

काही दिवसांपूर्वी तिचा नवरा गोल्डी बहेलनं ट्विट करून सोनालीच्या खुशालीची माहिती दिली. तो म्हणतो, सोनालीला तुम्ही इतकं प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. तिचे उपचार सुरू आहेत. त्यात कसलाच अडथळा येत नाहीय. पण हा प्रवास खूप मोठा आहे.

सोनालीच्या आजारपणात तिचा नवरा, नणंद, मुलगा सगळे नातलग, मित्र मैत्रिणी तिच्या सतत सोबत असतात. आजारी माणसाला हा मोठा अाधार असतो. त्यामुळेच तिची मानसिक स्थिती एवढ्या आजारातही उत्तम राहतेय.

काही दिवसांपूर्वी तिच्या तब्येतीची माहिती तिची नणंद सृष्टी आर्यानं दिली. सोनाली फार खंबीर असून ती कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी मोठ्या नेटाने दोन हात करत असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे सोनालीची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याचं स्पष्ट झालंय. सोनाली बेंद्रेच्या तब्येतीची काळजी प्रत्येकालाच आहे. त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनी थोडा सुटकेचा श्वास सोडलाय.

सोनाली बेंद्रे सध्या न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. वेळोवेळी सोशल मीडियावरून ती आपली परिस्थिती कशी आहे, हे सांगत असते. मध्यंतरी तिनं आपल्या मुलाला रणवीरला आपण कॅन्सरबद्दल कसं सांगितलं, याची माहिती दिली होती.

करिष्मानं फक्त पैशासाठी लग्न केलं होतं, म्हणतोय संजय कपूर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 04:06 PM IST

ताज्या बातम्या