श्रीदेवी मृत्यूप्रकरणात बोनी कपूर संशयाच्या भोवऱ्यात? पार्थिव भारतात येण्यास लागणार आणखी उशीर

श्रीदेवी मृत्यूप्रकरणात बोनी कपूर संशयाच्या भोवऱ्यात? पार्थिव भारतात येण्यास लागणार आणखी उशीर

श्रीदेवी जर 2-3 दिवस रूममधून बाहेर आल्या नाहीत तर त्यांनी सोडून तुन्ही भारतात का पळालात असा सवाल दुबई सरकारनं बोनी यांना विचारला आहे.

  • Share this:

27 फेब्रुवारी : श्रीदेवींच्या मृत्यूबाबत दुबईच्या सरकारी वकिलांकडून अजूनही चौकशी सुरू आहे. श्रीदेवींचं पार्थिव अजूनही कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेलं नाही. त्यामुळे श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात येण्यास आणखी उशीर होणार असल्याचं दिसतं आहे.  मृत्यूच्या 48 तासानंतर श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत अनेक वेगवेगळे तपास समोर येत आहेत. त्यामुळे पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दुबई पोलिसांकडून बोनी कपूर यांची चौकशी करण्यात आली पण शंकेचं निरासन न झाल्यामुळे त्यांना अद्यापही क्लीन चीट देण्यात आली नाही आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. त्या हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची आणि श्रीदेवी यांच्या प्रत्येक नातेवाईकांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

श्रीदेवी जर 2-3 दिवस रूममधून बाहेर आल्या नाहीत तर त्यांना सोडून तुम्ही भारतात का पळालात असा सवाल दुबई सरकारनं बोनी यांना विचारला आहे. त्यामुळे या तपासात अजून काय समोर येणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

या प्रकरणाची चौकशी कालच दुबई पोलिसांकडून सरकारी वकील कार्यालयाकडे सोपवण्यात आली आहे. पार्थिवाला रासायनिक लेप लावणे, त्यांचा पासपोर्ट रद्द करून श्वेत रंगाचा पासपोर्ट देणे, बोनी कपूर यांचा जबाब नोंदवणे आणि सरकारी वकिलांकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे, कायदेशीर प्रक्रियेतले हे टप्पे अजून बाकी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2018 07:41 AM IST

ताज्या बातम्या