लीक झाली मलायका-अर्जुनच्या लग्नाची तारीख, सगळे Details आले समोर

लीक झाली मलायका-अर्जुनच्या लग्नाची तारीख, सगळे Details आले समोर

अर्जुन-मलायकानं काही आॅफिशियल सांगितलं नसलं, तरी लग्नाची तारीख आणि त्यासंबंधीचे डिटेल्स समोर आलेत.

  • Share this:

मुंबई, 04 मार्च : गेले अनेक दिवस मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. काॅफी विथ करण शोमध्ये अभिनेत्री करिना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी दोघांच्या डेटिंगवर मोहोर लावलीय. आता दोघांच्या लग्नाची बातमी समोर येतेय. अर्जुन-मलायकानं काही आॅफिशियल सांगितलं नसलं, तरी लग्नाची तारीख आणि त्यासंबंधीचे डिटेल्स समोर आलेत.

सूत्रांच्या माहितीनुसार यावर्षाच्या एप्रिलमध्ये दोघांचं लग्न होणार आहे. हे लग्न अगदी खाजगी पद्धतीनं होईल. कुटुंबातले काही जण आणि जवळचे मित्र यात सामील होतील. असंही म्हणतात, हे लग्न ख्रिश्चन पद्धतीनं होईल. मलायकाची बहीण अमृता अरोरानंही ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं होतं. अर्जुन मलायकाला जसं हवं तसं लग्न करणार आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका नेहमीच एकत्र दिसतात. त्या दोघांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल फारसं काही सांगितलं नसलं तरी मलायकानं हिंट तर नक्कीच दिलीय. ती म्हणाली, मला अर्जुन कुठल्याही प्रकारे आवडतोच.

मलायकानं 18 वर्षांनी अरबाज खानला घटस्फोट दिलाय. इकडे मलायका अर्जुनबरोबर बिझी दिसते, तर अरबाजही आपली गर्लफ्रेंड जाॅर्जियाच्या हातात हात घालून फिरतोय.

घटस्फोटानंतर अरहानची कस्टडी आईकडे राहिली. अरहान शक्यतो लाइमलाइटपासून दूर राहतो. नुकातच तो आईसोबत अर्जुन कपूरला भेटला होता. अरहानची मलायका आणि अर्जुनसोबतचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान, मलायकाने करिना कपूरच्या चॅट शोमध्ये घटस्फोटानंतरची अरहानची प्रतिक्रियाही सांगितली.मलायका करिनाला म्हणाली की, ‘अरहानने हे स्वीकरालं आहे. त्याला आमच्या दोघांमध्ये बदल दिसत आहे. जेव्हा आमच्या दोघांचा घटस्फोट झाला होता तेव्हा अरहान मला म्हणाला होता की, तू फार आनंदी दिसत आहे.’

सनी लिओनची 'ही' सवय काही जाता जात नाही, शूटिंगलाही होतो खोळंबा

First published: March 4, 2019, 10:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading