मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'म्हणून Indian idol ला केलं रामराम'! सुनिधी चौहानचा आश्चर्यकारक खुलासा

'म्हणून Indian idol ला केलं रामराम'! सुनिधी चौहानचा आश्चर्यकारक खुलासा

अमित कुमार(Amit Kumar) यांनी शोबद्दल नाराजी व्यक्त करत एक खळबळजनक खुलासा केला होता.

अमित कुमार(Amit Kumar) यांनी शोबद्दल नाराजी व्यक्त करत एक खळबळजनक खुलासा केला होता.

अमित कुमार(Amit Kumar) यांनी शोबद्दल नाराजी व्यक्त करत एक खळबळजनक खुलासा केला होता.

मुंबई, 1 जून- ‘इंडियन आयडॉल’(Indian Idol)  सतत विवादांत अडकत चालला आहे. कधी स्पर्धकांमुळे, कधी होस्टमुळे कधी परीक्षकांमुळे तर कधी उपस्थित असलेल्या पाहुण्या कलाकारांमुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. अमित कुमार(Amit Kumar) यांनी शोबद्दल नाराजी व्यक्त करत एक खळबळजनक खुलासा केला होता. त्यानंतर अनेक कलाकरांनी या शोबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आत्ता यामध्ये गायिका सुनीधी चौहानचा (Sunidhi Chauhan) सुद्धा समावेश झाला आहे.

गायिका सुनिधी चौहाननं माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत ‘इंडियन आयडॉल’ या शोबद्दल खुलासा करत म्हटलं आहे, ‘निर्मात्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण ऐकू शकत नाही. किंवा ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, त्या आपण करू नये. तसेच सर्व विचार बाजूला ठेवून आणि योग्य ते निष्कर्ष न देता स्पर्धकांचं कौतुकदेखील करायला सांगितल होतं. असं देखील सुनिधीनं म्हटलं आहे. हे सर्व फक्त प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी केल जातं. तसेच यामध्ये कोणत्याही स्पर्धकाची काही चूक नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच सुनिधी म्हणते, एखाद्या स्पर्धकाची लाईफ स्टोरी दाखवून, त्याला रातोरात लोकप्रियता मिळवून दिली जाते. मात्र त्या स्पर्धकाची पुढे काहीतरि उत्तम करण्याची इच्छा संपून जाते. आणि हे स्पर्धक आपल्या ध्येयापासून भरकटतात. त्यामुळे त्यांचं करीयरसुद्धा खराब होऊ शकतं. असं सुनिधीनं म्हटलं आहे.

(हे वाचा: 'त्या' NUDE सीनपूर्वी राधिका आपटेशी अशी झाली होती चर्चा,आदिल हुसैनचा मोठा खुलासा)

गायिका सुनिधी चौहान इंडियन आयडॉल सीजन 5 आणि 6 मध्ये परीक्षक होती. मात्र यांनतर तिने या शोला रामराम केलं होतं. आणि आज पहिल्यांदा त्याचं कारण देखील तिनं स्पष्ट केल आहे.

(हे वाचा:तब्बल 20 वर्षांनी गोविंदा आणि नीलम आले एकत्र, जबरदस्त डान्स VIDEO होतोय VIRAL  )

यापूर्वी अमित कुमार, अभिजीत सावंत, सोनू निगम यांनी सुद्धा इंडियन आयडॉलबद्दल असचं काहीसं आपलं मत व्यक्त केल आहे. आत्ता सुनिधीच्या या खुल्यास्यामुळे इंडियन आयडॉल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Indian idol