मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: नेहा कक्करचा रॉयल कारभार; अशी घेतली नेहा–रोहनप्रीतने लग्नाच्या वेळी एन्ट्री

VIDEO: नेहा कक्करचा रॉयल कारभार; अशी घेतली नेहा–रोहनप्रीतने लग्नाच्या वेळी एन्ट्री

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet)चं लग्न एकदम दणक्यात पार पडलं आहे. त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

  • Published by:  Amruta Abhyankar
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar)चं शनिवारी लग्न झालं. पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh)सोबत नेहा विवाह बंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीचे नेहाने तिच्या आणि रोहनप्रीतच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली होती. नेहाचं लग्न दणक्यात पार पडलं आहे. तिच्या लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेहा कक्करने नववधूच्या रुपात अतिशय देखणी दिसत होती. तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर सध्या नेहाच्या लग्नाचीच चर्चा आहे. नेहा आणि रोहनप्रीतच्या ग्रँड वेडिंगला तिचं कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न असा लग्नाचा सोहळा गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे. रविवारी नेहाचं रिसेप्शन आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या या रिसेप्शनला बॉलिवूडमधील मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नेहाच्या लग्नाचे 3 व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पहिला व्हिडीओ - या व्हिडीओमध्ये नेहा आणि रोहनप्रीतची ग्रँड एन्ट्री दाखवली आहे.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये नेहा कक्कड, टोनी कक्कड, साहित कई पंजाबी गाणं गाताना दिसत आहेत. नेहा कक्करने रोहनप्रीतसाही 'मिलें हो तुम हमको' गाणं म्हटलं.
View this post on Instagram

#nehakakkar #rohanpreetsingh #nehudavyah #nehakishaadi #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

तिसरा व्हिडीओ अतिशय खास आहे कारण या व्हिडीओमध्ये नेहाने रोहनप्रीतसाठी 'नेहू दा व्याह' हे गाणं म्हटलं आहे.
View this post on Instagram

Neha sang one of her own tracks ❤ #nehakakkar #rohanpreetsingh #nehudavyah #nehakishaadi #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अशाप्रकारे नेहा आणि रोहनप्रीतचं ग्रँड वेडिंग पार पडलं आहे.
First published:

Tags: Bollywood, Neha kakkar

पुढील बातम्या