नेहा कक्कर लवकरच चाहत्यांना देणार गोड बातमी! 'या' सिंगरसोबत करणार लग्न

नेहा कक्कर लवकरच चाहत्यांना देणार गोड बातमी! 'या' सिंगरसोबत करणार लग्न

यापूर्वीही तिच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. याआधी रिअॅलिटी टीव्ही शो इंडियन आयडलच्या शेवटच्या सीझनमध्ये नेहा कक्कड़ आणि आदित्य नारायण लग्न करणार असल्याची सतत चर्चा सुरू होती.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : बॉलिवूडची टॉप सिंगर नेहा कक्करच्या (Neha kakkar marriage) लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. यापूर्वीही तिच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. याआधी रिअॅलिटी टीव्ही शो इंडियन आयडलच्या शेवटच्या सीझनमध्ये नेहा कक्कड़ आणि आदित्य नारायण लग्न करणार असल्याची सतत चर्चा सुरू होती, मात्र नंतर हे केवळ कार्यक्रमासाठी करण्यात आले होते, असे सांगण्यात आले. आता मात्र नेहा या महिन्या अखेरीस बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा आहेत.

यापूर्वी नेहा कक्कर ही अभिनेता हिमांश कोहलीसोबत बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होती, ते दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले, दोघांनी सोशल मीडियावर एकमेंकावर अनेक आरोप केले. आता पुन्हा एकदा नेहा कक्करच्या लग्नाची बातमी येत आहे.

यावेळी असे सांगितले जात आहे की नेहा कक्करनं ठरवले आहे की ती लग्न करणार आहे. बर्‍याच मीडिया रिपोर्ट्समध्ये सिंगर रोहनप्रीत सिंगशी नेह लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आआहे. रोहनप्रीत आणि नेहा या महिन्याच्या अखेरीस लग्न करू शकतात. दोघांचे कुटुंबियही एकमेकांना भेटल्याचे सांगितले जात आहे.

View this post on Instagram

Shukar Hai Mere Rabba! ♥️

A post shared by Rohanpreet Singh (@rohanpreetsingh) on

रोहनप्रीत सिंग 'राइजिंग स्टार' या रिअॅलिटी शोमध्ये उपविजेता होता. त्यानंतर रोहनप्रीत बिग बॉस फेम शहनाज गिलचा टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'मुझसे शादी करोगे' मध्येही दिसला होता. रोहनप्रीत सोशल मीडियावर नेहासोबत अनेक फोटो शेअर करत असतो. दरम्यान अद्याप याबाबत नेहानं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 5, 2020, 11:21 AM IST

ताज्या बातम्या