मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; हटके वरमाला चर्चेत

गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; हटके वरमाला चर्चेत

राजकुमार - पत्रलेखा यांच्यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade)  विवाह बंधनात (Shalmali Kholgade wedding ) अडकली आहे.

राजकुमार - पत्रलेखा यांच्यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade) विवाह बंधनात (Shalmali Kholgade wedding ) अडकली आहे.

राजकुमार - पत्रलेखा यांच्यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade) विवाह बंधनात (Shalmali Kholgade wedding ) अडकली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 30 नोव्हेंबर- बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई जोरात सुरू आहे. राजकुमार - पत्रलेखा यांच्यानंतर आता प्रसिद्ध बॉलिवूड गायिका शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade)  विवाह बंधनात (Shalmali Kholgade wedding ) अडकली आहे. बॉय फ्रेंड फरहान शेखसोबत (Farhan Shaikh ) शाल्मलीने 22 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. शाल्मलीने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.

शाल्मलीने लग्नाचे फोटो शेअर करत म्हटले आहे की, 22 नोव्हेंबर 2021 हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस. या माझ्या प्रिय व्यक्तीसोबत माझे लग्न झाले. आमचा विवाह सोहळा आमच्या घरातील लिव्हींग रूममध्ये झाला. या सोहळ्याला आमचे काही मोजके नातेवाईक आणि घऱची मंडळी उपस्थित होती.

 वाचा : ट्विटरच्या नव्या CEO चं श्रेया घोषाल कनेक्शन माहितेय का? थ्रोबॅक फोटो झाले VIRAL

शाल्मलीने गुपचूप आणि अत्यंत साध्यापणे लग्न उरकून घेतले. यावेळी दोघेही खूप सुंदर दिसत होते.ऑरेंज आणि पांढऱ्या रंगाची साडी, कानात झुमके आणि गजरा असा सिंपल लूक शाल्मलीने लग्नासाठी केला होता. तसेच शाल्मली आणि फरहान यांच्या विवाह सोहळ्याच्या फोटोमधील दोघांच्या गळ्यातील माळांनी अनेकांचे लक्ष वेधले. या माळा कागदी फुलं आणि दोघांच्या फोटोपासून तयार करण्यात आल्या आहेत.

वाचा : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान प्रियांका-निक झाले रोमँटिक; फोटो शेअर करत व्यक्त केलं प्रेम

शाल्मलीने गायलेल्या दारू देसी, परेशान , बालम पिचकारी या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तसेच 'सूर नवा ध्यास नवा' आणि 'इंडियन आयडॉल ज्युनियर' या शोमध्ये तिने परीक्षकाची भूमिका पार पडाली. लग्नसोहळ्याचे फोटो शाल्मलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shalmali (@shalmiaow)

शाल्मली आणि फरहान दोघंही गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांनाही गाजावाजा नको होता. आधी दोघांचाही कोर्ट मॅरेज करण्याचा विचार होता. पण नंतर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अगदी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment