VIDEO : बेगानी शादी में..., दुसऱ्यांच्या लग्नात रणवीरची अचानक एण्ट्री

VIDEO : बेगानी शादी में...,  दुसऱ्यांच्या लग्नात रणवीरची अचानक एण्ट्री

सिनेमाच्या प्रमोशनसाठी आत्तापर्यंत कलाकार रियालिटी शोमध्ये गेले आहेत. परंतु एखाद्या लग्नाला हजेरी लावून चित्रपटाचं प्रमोशन करण्याच्या नव्या प्रकाराला रणवीरनं प्रारंभ केला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : बॉलिवूडच्या मस्तीखोर अभिनेत्यांपैकी एक रणवीर सिंग कधी काय करेल याचा काही नेम नाही. प्रत्येक कार्यक्रमात त्याची स्टाईल आणि त्याच्या स्वभावाचा असलेला वेगळेपणा नेहमी आपल्याला दिसून येत असतो. यावेळी पण रणवीरने असंच काही वेगळं केलं आहे.

सध्या रणवीर सिंबा चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान रणवीरने एका लग्नामध्ये जाऊन तिथे देखील त्याचा जलवा दाखवायला सुरुवात केली. यामुळे तो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

सिंबा चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी रणवीर एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याला कळताच की हॉटेलमध्ये एक लग्न सुरू आहे. त्याने लगचेच पाहुणे बनून त्या लग्नाला हजेरी लावली. रणवीरला पाहून लग्नातील सर्व मंडळी आणि नवरा-नवरी देखील आश्चर्य झाले. रणवीरने नवरा-नवरीला लग्नाच्या शुभेच्छा देत त्याने फोटोसुद्धा काढले.

 

 

View this post on Instagram

 

#RanveerSingh at a wedding today

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रणवीर सिंगचा सिंबा चित्रपट येत्या 28 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंग पहिल्यांदा पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटात सारा अली खान मुख्य भूमिकेत असेल. सिनेमाचं प्रोमोशन जोरदार सुरू आहे.

आत्तापर्यंत सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेते रियालिटी शोमध्ये गेले आहेत. परंतु एखाद्या लग्नाला हजर राहून चित्रपटाचं प्रमोशन करण्याच्या नव्या प्रकाराला रणवीरने सुरुवात केली आहे. लग्नात रणवीर सिंगने वयस्कर, मोठ्यांचे आर्शिवाद घेत त्यांने  निरोप घेतला.

First published: December 18, 2018, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading