शाहरुखच्या 'झीरो'च्या पोस्टरवर यांचा आहे आक्षेप

शाहरुखच्या 'झीरो'च्या पोस्टरवर यांचा आहे आक्षेप

पोस्टरवर शाहरुखनं नोटांचा हार घातलाय आणि कृपाण अडकवलंय. म्हणून शीख समाजातून या चित्रपटाला विरोध होतोय.

  • Share this:

मुंबई, 6 नोव्हेंबर : शाहरुख खानच्या झीरो सिनेमाची चर्चा जोरदार आहे. विशेषत: शाहरुखच्या लुकची. पण आता झीरोच्या पोस्टरवर शीख समाजानं आक्षेप जाहीर केलाय. शीख गुरुद्वार प्रबंधक कमिटी आणि इतर संघटनांनी विरोध केलाय.

त्यांचं म्हणणं असं की, पोस्टरवर शाहरुखनं नोटांचा हार घातलाय आणि कृपाण अडकवलंय. कृपाण शिखांचं धार्मिक चिन्ह आहे. त्याची मस्करी केल्याची भावना त्यांच्यात आहे. डीएसजीपीसीच्या धर्म प्रचार कमिटीचे चेअरमन परमजीत सिंह राणा यांनी पत्रात लिहिलंय, ' शाहरुख खानचं पोस्टर समोर आलंय. त्यात त्याच्या गळ्यात कृपाण आहे. ही मस्करी केलेली दिसतेय.'

चित्रपटाचा पहिला टीझर पाहिला तर ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ हीच म्हण आठवते. आता बादशाह शाहरुख शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ यांनी 'पा' चित्रपटात वेगळा लूक केला होता. आता शाहरुखही 'झिरो' चित्रपटातून वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बवुआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.

शाहरुखने या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज केलं ते अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत. चित्रपटात अनुष्काने शास्त्रज्ञाची भूमिका बजावली आहे. ‘नातं बरोबरीचं’ असं कॅप्शन देत सोशल मीडियावर पोस्टर शेअर करण्यात आलं. पोस्टर आणि त्याचं कॅप्शन पाहता चित्रपटात शाहरूख आणि अनुष्काची मैत्री किंवा मैत्रीपलीकडील प्रेम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चित्रपटात दोघांनीही कमी उंचीच्या माणसांची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यामुळे चित्रपटात दोघांची उंची जरी सारखी दिसत असली तरी अभिनयात कोण उंची गाठेल, हे प्रत्यक्ष चित्रपट पाहूनच कळेल.

First published: November 5, 2018, 8:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading