Home /News /entertainment /

'शेरशाह'नंतर पुन्हा एकत्र दिसणार सिद्धार्थ-कियारा; पडद्यावर रोमान्स करणार लव्हबर्ड्स

'शेरशाह'नंतर पुन्हा एकत्र दिसणार सिद्धार्थ-कियारा; पडद्यावर रोमान्स करणार लव्हबर्ड्स

बॉलिवूड (Bollywood) चित्रपटांमध्ये काही जोड्या अगदी सुपरहिट ठरल्या आहेत. या जोड्यांना प्रेक्षक पुन्हा-पुन्हा एकत्र पाहू इच्छितात. अशीच एक जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी (Sidharth Mlhotra & Kiara Advani) होय. 'शेरशाह' मधील सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जून-   बॉलिवूड   (Bollywood)  चित्रपटांमध्ये काही जोड्या अगदी सुपरहिट ठरल्या आहेत. या जोड्यांना प्रेक्षक पुन्हा-पुन्हा एकत्र पाहू इच्छितात. अशीच एक जोडी म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी  (Sidharth Mlhotra & Kiara Advani) होय. 'शेरशाह' मधील सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे प्रेक्षक त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्याची प्रतीक्षा करत आहेत. आता ही प्रतीक्षा लवकरच समाप्त होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोन्ही कलाकार पुन्हा एकादा एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. सिद्धार्थ आणि कियारा हे दोघंही सतत त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. या दोघांनी कधीच उघडपणे आपलं नातं मान्य केलेलं नाही. मटार तरीसुद्धा चाहत्यांना त्यांच्याबाबत लहान-लहान अपडेट्स जाणून घेण्यात रस असतो. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काही तरी बिनसल्याचं आणि इतकंच नव्हे तर त्यांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र पुन्हा या दोघांनी विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून येत या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. दरम्यान, इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​एका रोमँटिक चित्रपटासाठी चर्चेत आहेत. पोर्टलनुसार, एका सूत्राने सांगितलं आहे की, “सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी यांची एका रोमँटिक चित्रपटासाठी चर्चा सुरु आहे. या चित्रपटात दोघेही एकत्र रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. (हे वाचा:Alia Bhatt pregnancy: 'मी एक स्त्री आहे पार्सल नाही'; माध्यमांच्या खोट्या बातम्यांवर भडकली आलिया ) सूत्राने पुढे सांगितलं की, "सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी या दोघांनाही स्क्रिप्ट आवडली आहे. परंतु त्यांनी अद्यापही त्यावर स्वाक्षरी केलेली नाही." जर हा रिपोर्ट खरा ठरला तर चाहत्यांना सिद्धार्थ आणि कियारा यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. 'शेरशाह' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली होती.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Kiara advani, Sidharth Malhotra

    पुढील बातम्या