• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'जर मी पंजाबी मुलीशी लग्न केलं असतं तर...' शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा VIDEO झाला तुफान VIRAL

'जर मी पंजाबी मुलीशी लग्न केलं असतं तर...' शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा VIDEO झाला तुफान VIRAL

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa shetty) पती राज कुंद्राने (Raj kundra) इन्स्टाग्रामवर (Instagram) एक नवीन व्हिडिओ (Video) शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 जानेवारी: बॉलीवूड अभिनेत्री  (Bollywood Actress) शिल्पा शेट्टी (Shilpa shetty)आणि नवरा राज कुंद्रा (Raj kundra) दोघंही सोशल मीडियावर (Social media) खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. हे दोघंही स्वतः च्या मनोरंजनासोबत (entertainment) सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणतात. त्यांचे मजेदार व्हिडिओ (Funny videos) सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. आता राज कुंद्राने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यानं म्हटलं आहे की, त्यानं जर एखाद्या 'पंजाबी मुली' सोबत लग्न केलं असतं तर ती नवरी मुलगी कशी दिसली असती. शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन लिहिलं की- 'जर मी पंजाबमधील खेड्यातील एखाद्या मुलीशी लग्न केलं असतं तर, ती अशी दिसली असती'. हे मूळ गाणं 'लौंग लाची' असून या  व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीचा चेहरा मॉर्फ केलेला दिसत आहे. व्हिडिओ फेस फिल्टरने हा व्हिडिओ बनवला आहे. ज्यामध्ये पंजाबी कुडी शिल्पा शेट्टी बनली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

  या स्टार कपलचं प्रेम जगजाहीर आहे. आपल्या पत्नीसमवेत राज कुंद्राने अनेकदा बॉलिवूडच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. यावेळी त्याने अनेकदा आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तसेच दोघातलं बॉंडींगही जबरदस्त आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या लग्नाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दोघांना एक 8 वर्षाचा मुलगा आहे. ज्याचं नाव वियान आहे. याशिवाय गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांना मुलगीही झाली आहे. तिचं नाव समिशा असून तिचा जन्म सरोगसीने झाला आहे. अलिकडच्या काळात शिल्पा शेट्टी चित्रपटांपासून थोडीसी दूर गेली आहे. परंतु शिल्पा शेट्टी बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या व्हिडिओ आणि फोटोजला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देतात.
  Published by:News18 Desk
  First published: