Home /News /entertainment /

दिलीप कुमारांच्या भेटीला रुग्णालयात पोहोचले शरद पवार, पाहा VIRAL PHOTO

दिलीप कुमारांच्या भेटीला रुग्णालयात पोहोचले शरद पवार, पाहा VIRAL PHOTO

ज्येष्ठ अभिनेता (Actor) दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  मुंबई, 6 जून- ज्येष्ठ अभिनेता (Actor)  दिलीप कुमार (Dilip Kumar)  यांना आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वास घेण्यात अडचण होतं होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जेव्हा ही माहिती सर्वत्र समजली. तेव्हा देशभरातून त्यांचे चाहते आणि मोठ मोठ्या व्यक्ती त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), यांनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांची भेट घेतली. नुकताच शरद पवार यांचे काही फोटो विरल भयानी यांनी शेयर केले  आहेत. यामध्ये ते रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहेत. काही तासांपूर्वी दिलीप कुमार यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांच्या सहकरयांनी त्यांची हेल्थ अपडेट दिली होती.
  दिलीप कुमार यांच्या ऑफीशियल ट्वीटर अकाऊंटवरून माहिती देत सांगण्यात आलं होतं, ‘की दिलीप कुमार यांना रेग्युलर टेस्टसाठी खारमधील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच डॉ. निखील गोखले यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांची एक टीम त्यांची देखरेख करत आहे. कृपा करून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, आणि सुरक्षित राहा’. असं ट्वीट करण्यात आलं आहे. (हे वाचा: 'कधी मुलगी नाही बघितली का'? कोणावर भडकली राखी सावंत'; हा VIDEO एकदा पाहाच ) यापूर्वी मे महिन्यामध्ये रुटीन चेकअप साठी दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सर्व टेस्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांनी 1944 मध्ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून आपल्या करीयरला सुरुवात केली होती. पाच दशकांच्या आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. कोहिनूर, मुगल-ए-आझम, नया दौर, राम और श्याम, देवदास असे एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Sharad pawar

  पुढील बातम्या