IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट

पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये भारताने एकही सामना गमवलेला नाही. पण याच पाकिस्तानच्या संघाने चॅम्पियन चषक स्पर्धेत भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 04:25 PM IST

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी शाहरुखने घेतले खास टीशर्ट

मुंबई, 16 जून- जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष आज फक्त भारत- पाकिस्तान सामन्यावर असणार आहे. या सामन्यावर पावसाने पाणी फिरवू नये यासाठी अनेकजण देवाकडे साकडं घालत आहेत. तर अनेकांनी आजचा सामना भारताने जिंकावा यासाठी पूजादेखील करत आहेत. यात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान मागे नाही.

रोमान्सचा बादशहा शाहरुखने यासाठी खास टीशर्टही बनवून घेतले. शाहरुखने त्याच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला. यात तो आणि त्याचा मुलगा आर्यन कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेले दिसत आहेत. दोघांनी टीम इंडियासारखी निळ्या रंगाची जर्सी घातली आहे. शाहरुखच्या जर्सीवर मुफासा असं लिहिलं आहे तर आर्यनच्या जर्सीवर सिंबा असं लिहिलेलं आहे. हा फोटो शेअर करताना शाहरुखने लिहिले की, ‘फादर्स डेच्या जोशसह सामन्यासाठी तय्यार. गो इंडिया गो...’

हेही वाचा- पाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी

सकाळपासून मँचेस्टरचं आकाश मोकळं आहे. काही ठिकाणं सोडल्यास बाकी सर्व ठिकाणी निरभ्र आकाश आहे. गेल्या दोन- तीन दिवसांमध्ये तिथे पाऊसही फार पडला नाही. या सर्व गोष्टी भारताच्या बाजूने असल्यामुळे क्रिकेटप्रेमी खूश आहेत.हेही वाचा- प्रकाश राजसोबत सेल्फी काढला म्हणून महिलेच्या पतीने केला अपमान

दरम्यान, आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील 22वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये भारताने एकही सामना गमवलेला नाही. पण याच पाकिस्तानच्या संघाने चॅम्पियन चषक स्पर्धेत भारताचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. त्यामुळेच पाकिस्तानच्या संघाला कमी लेखण विराटसेनेसाठी धोक्याचे ठरेल. मोहम्मद आमिर, वहाब रियाझ हे गोलंदाज भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही फलंदाज टॉप फॉर्ममध्ये आहेत आणि जेव्हा या दोघांची बॅट चालते तेव्हा गोलंदाजांचे काही चालत नाही.

Loading...

हेही वाचा- युवराज सिंग, धोनीबद्दल हा अभिनेता म्हणाला, ‘दुश्मनी गेहरी है...’

5 हजारांसाठी उसतोड कामगाराचं अपहरण CCTV व्हिडिओ समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2019 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...