...म्हणून शाहरूख खान गेला आमिरला भेटायला!

...म्हणून शाहरूख खान गेला आमिरला भेटायला!

बाॅलिवूडमध्ये वर्चस्व आहे तीन खानांचं. शाहरूख, सलमान आणि आमिर. या तिघांमध्ये नेहमी शीतयुद्ध सुरू असतं, अशी चर्चाही असते. पण खरं तर चित्र वेगळंच दिसतंय.

  • Share this:

मुंबई, 01 नोव्हेंबर : बाॅलिवूडमध्ये वर्चस्व आहे तीन खानांचं. शाहरूख, सलमान आणि आमिर. या तिघांमध्ये नेहमी शीतयुद्ध सुरू असतं, अशी चर्चाही असते. पण खरं तर चित्र वेगळंच दिसतंय. इन्स्ट्राग्रामवरची पोस्ट पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय.

शाहरूख खाननं इन्स्ट्राग्रामवर आमिरसोबतचा फोटो पोस्ट केलाय. त्यावरची कॅप्शनही अचंबित करणारी आहे. हग फ्राॅम द ठग. आमिरला शुभेच्छा देण्यासाठी शाहरूख खान पोचला असावा. आमिरला उद्देशून त्यानं ही कॅप्शन लिहिलीय.

View this post on Instagram

Hug from the Thug....!! Beat that!

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

बहुचर्चित ठग्ज आॅफ हिंदोस्तान दिवाळीत रिलीज होतोय. बाॅलिवूडचा सर्वात महाग सिनेमा रिलीज होतोय. ठग्ज आॅफ हिंदोस्तान. पहिल्यांदा आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र सिनेमात काम करतायत. या सिनेमात बिग बींची व्यक्तिरेखा आहे खुदाबक्श आणि आमिर खान बनलाय चलाक फिरंगी.

सिनेमात बिग बी आणि आमिर खान यांच्यावरचं गाणं रिलीज करण्यात आलंय. वशमल्ले म्हणत दोघांनीही या गाण्यात एकच धमाल केलीय. प्रभुदेवानं या गाण्याची कोरिओग्राफी केलीय.

अगर आजादी है गुन्हा, तो मंजूर है सजा... असेच भारदस्त डायलाॅग्ज ऐकायला मिळणार आहेत. 1795मधली ही कथा. ब्रिटिश राजवटी विरोधात भारतीयांनी पुकारलेलं बंड. ते मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी नेमलेला फिरंगी. फिरंगी विरुद्ध आजाद असं फुंकलं गेलं रणशिंग.

लार्जर दॅन लाईफ शाॅट्स, जबरदस्त अॅक्शन्स, भारदस्त डायलाॅग्ज हे सर्व पाहून रसिक प्रेक्षक भारावूनच गेलेत. ट्रेलर इतका भव्य दिव्य, तर मग सिनेमा किती असेल, याचा विचार सगळे करतायत.

शाहरूख खानचा झीरो नाताळला रिलीज होतोय. यात किंग खान बुटक्या माणसाच्या भूमिकेत आहे. आनंद एल रायचं दिग्दर्शन असलेल्या झीरो सिनेमात कतरिना कैफ आणि आलिया भट आहेत. श्रीदेवीचाही सिनेमात स्पेशल अॅपियरन्स आहे. याशिवाय झीरोमध्ये काजोल, राणी मुखर्जी, करिष्मा कपूर यांचीही झलक पाहायला मिळेल. 21 डिसेंबरला झीरो रिलीज होईल.

करिना कपूर जिमला जाताना कॅमेऱ्यात कैद, Photos व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading